पुणे 

बिर्याणीवरून झाली तुफान हाणामारी

पुणे (अभयकुमार देशमुख) :

​​पुण्यातील धायरी परिसरातल्या गणेश नगर येथे  बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी कोयत्याने वार करुन हॉटेल व्यावसायिकासह दोघांच्या खुनाचा प्रयत्न केला.

बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाचा हॉटेल व्यावसायिकाशी वाद झाला होता, त्यानंतर त्याने सहा मित्रांना बोलावून हल्ला केला.

गणेशनगरमधील एका बिर्याणी हॉटेलमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी मयुर मते (वय 33 वर्ष, रा. धायरी) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: