सिनेनामा

चित्रपट निर्माते के. व्ही. आनंद यांचे निधन

चेन्नई :
प्रसिद्ध तामिळी चित्रपट निर्माते के. व्ही. आनंद (K. V. Anand) यांचे शुक्रवारी पहाटे हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली.
मागील काही दिवसांपासून आनंद यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक‘वारी पहाटे हदयविकाराचा धक्का बसला आणि यातच त्यांचे निधन झाले. आनंद यांनी 1994 मध्ये थेनमाविन कोबांथ या मल्याळी चित्रपटाद्वारे आपली कारकीर्द सुरू केली. या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. काना कांदेन (2005) द्वारे आनंद यांनी तामिळ चित्रपटात प्रवेश केला. दरम्यान, प्र‘यात अभिनेते तसेच मक्कल निधी मैयम पक्षाचे अध्यक्ष कमल हासन यांनी संवेदना व्यक्त करत चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: