गोवा 

१ जूनपासून राज्यात मासेमारी बंद

पणजी:
१ जूनपासून राज्यातील मासेमारी बंद होणार आहे. तब्बल ६१ दिवस मासेमारी होणार नाही. त्यामुळे राज्यातील नागरिकांना पुढील दोन महिने ताजे मासे मिळणार नसून, सुकी मासळीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
यंदा मान्सून वेळेत गोव्यात पोहचणार असल्याचे सुतोवाच हवामान वेधशाळेने केले आहे. परीणामी, १ मेपासून राज्यातील मासेमारी बंद करण्याचे आदेश मच्छीमार खात्याने दिले आहेत. त्यामुळे पुढील किमान ६१ दिवस गोमंतकीयांना त्यांच्या आवडीचे मासे मिळणार नाहीत. त्यांना चिकन, मटन आणि सुक्या मासळींवर अवलंबून राहावे लागणार आहे. दुसरीकडे बेळगाव आणि कोकणात कोरोना प्रादुर्भावामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. चिकनच्या कोंबड्यांची आयात गेल्या कांही दिवसांपासून थंडावली असल्याचे मत पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त संचालक प्रकाश कोरगावकर व्यक्त करतात.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: