सातारा 

बॅंकेच्या पैशातून कोणाला करायचा होता ‘फाईव्ह स्टार’ स्पा?

सातारा (महेश पवार) :

येथील एका बँकेच्या संचालक मंडळातील काही सदस्यांची महाबळेश्वर मधील फाइव्ह स्टार हॉटेलात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जवळपास या आलिशान हॉटेलात जवळपास बारा ते तेरा रूम बुक करण्यात आल्या होत्या. यामुळे आता सर्व सोयीनियुक्त हॉटेल असल्याने उपस्थित असलेल्या एका संचालकाने ‘स्पा’ केला.

यावेळी संबंधित संचालकानी रेट कार्ड बघूनच स्पा चा आनंद घेतला यावेळी त्यांना वाटलं की आपण बॅंकेच्या कार्यशाळेला आलोय म्हणजे बॅकच सगळं बघणार , परंतु ज्यावेळी कार्यशाळा झाली आणि बिल देण्याची वेळ येते तेव्हा बॅंकेच्या अधिकार्यानी स्पा चे बिल संबंधित संचालकांकडून घ्या म्हटल्यावर संबधिताने अगोदर चिडचिड केली.

बिल अदा करत असताना इतकं महागडं स्पा बॅंकेच्या पैशातून होईल असं वाटत असतानाच स्वतः च्या पाकिटातून साठ ते सत्तर हजार गेलेल्याचे दुःख नक्कीच झाले असणार.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: