गोवा 

कोविड हॉस्पिटलमध्ये ‘आप’च्या वतीने मोफत जेवण सेवा

पणजी :
आम आदमी पार्टीने या कोविड संकटाच्या वेळी लोकांची सेवा करण्यासाठी विविध उपक्रम राबवल्यानंतर गोव्यातील तीन सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या नातेवाईकांसाठी आता विनामूल्य फूड पार्सल सेवा सुरू केली आहे.
” जेव्हा पक्षाचे कार्यकर्ते ऑक्सिजन सिलिंडर वितरीत करण्यासाठी विविध रुग्णालयात गेले तेव्हा या सेवेची आवश्यकता असल्याचे त्यांच्या लक्षात आले” असे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले.
“लॉकडाउन निर्बंधामुळे बरीच रेस्टॉरंट्स बंद आहेत आणि सार्वजनिक वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आले की, आधीच कोविड रूग्णाच्या चिंतेत असलेल्या नातेवाईकांना अन्नपाण्याची प्रचंड गैरसोय सहन करावी लागत होती आणि म्हणून त्वरित आम्ही यावर काम करण्यास सुरवात केली ”.
सदर उपक्रमाचे समन्वयक व युवा संघटनेचे नेते श्रीपाद पेडणेकर यांनी सांगितले की, “गोडविन फर्नांडिस, रितेश शेनाई, मॅनुअल कार्डोसो आणि इरफान यांनी रविवारी मापुसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात संयोजक राहुल म्हांबरे यांच्याबरोबर भोजन सेवा सुरू केली आहे, तर प्रतिमा कौटीनो, संदेश तेलकर आणि लिंकन वाझ  यांनी आजपासून मारगावमधील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात अन्नसेवा सुरू केली आहे.”  पेडणेकर यांनी सांगितले की,  “वाल्मिकी नाईक, निखिल हळदणकर आणि हमीद उद्यापासून जीएमसी बांबोली येथे ही सेवा सुरू करणार आहेत”
म्हांबरे म्हणाले की, ‘आप’ने जनतेची सेवा करण्यासाठी घेतलेल्या या पुढाकारांचे राज्यभरातील गोवंशांनी कौतुक केले आहे. ऑक्सिमीटर सेवा, ऑक्सिजन सिलिंडर वितरित करणे, रक्तदान मोहीम, प्लाझ्मा दान मोहीम इत्यादी कार्यक्रमांनी राज्यसरकारने वाऱ्यावर सोडलेल्या गोयंकर लोकांना दिलासा मिळाला आहे. आणि या जनतेसाठी आपचा  लढा व सेवा सुरू ठेवण्यासाठी आम्ही  वचनबद्ध आहोत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: