गोवा 

पेडण्यात विद्यार्थ्यांसाठी मोफत व्हायफाय इंटरनेट 

आ. दयानंद सोपटे व जीत आरोलकर यांचा पुढाकार 

पेडणे  (प्रतिनिधी) :

शिक्षण खात्याने ग्रामीण भागात इन्टरनेट सेवा विधार्थ्यासाठी उपलब्ध आहे कि नाही , विधार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन घेण्याची क्षमता आहे कि नाही , याची चौकशी न करता थेट सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरु करून विधार्थी आणि पालकाना चिंतेत टाकले आहे. याची गंभीर दखल घेत मांद्रे मतदार संघातील गरजवंत विध्यार्थ्यासाठी मोफत व्हायफाय इन्टरनेट सेवा मगोचे जीत आरोलकर व आमदार दयानंद सोपटे यांनी सुरु केली आहे.

मगोचे जीत आरोलकर यांनी सर्वात प्रथम मांद्रे पंचायत क्षेत्रात पंचायत सभागृहात १९ रोजी सेवा कार्यरत केली , तर मांद्रेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेअरमन  दयानंद सोपटे यांनी २० रोजी पार्से पंचायत क्षेत्रातील विधार्थ्याना मोफत इन्टरनेट सेवा उपलब्ध करून देण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला .

मांद्रे मतदार संघातील भारतीय संचार निगम तर्फे ग्राहकाना पुरवण्यात येणारी इन्टरनेट सेवा बेभरवशाची बनली आहे .त्यामुळे अनेकांनी भारतीय संचार निगम सेवा खंडित करून इतर कंपन्याकडून इन्टरनेट सेवा उपलब्ध करून घेतली आहे .

लॉकडाऊन काळात विधार्थ्यांचे शिक्षण थांबू नये म्हणून सरकारने ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरु करण्याचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्षातहि घेतलेला आहे . काही ठिकाणी शिकवण्या सुरूही झाल्या . मात्र ऑफलाईन असलेल्या विधार्थ्याना किंवा शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण देताना आणि घेताना मोठे आव्हान समोर राहिले आहे . ज्याना मोबाईल हाताळायला जमत नाही ते बालविधार्थी त्याचा कसा वापर करतील , ज्यांच्या घरात दोन चार मुले आहेत ते एका मोबाईलवर ऑन लाईन शिक्षण कसे घेणार, याचा सरकारने सर्वांगीण विचार केला नाही. एका बाजूने शिक्षक पालक तज्ञ सांगत असतात मुलाना मोबाईल देवू नका , त्यांच्या हातात मोबाईल पडला तर त्याचा गैर वापर होणार नाही कश्यावरून ?  कधी कधी विजेच्या लंपडावाने  रेंजच नाही त्यांच्या अडचणी ऑफ लाईन शिक्षण कसे देणार त्यासाठी शिक्षकांनी व्यवस्थापन समितीने विचार करावा .

पेडणे तालुक्यात किमान एक लाख लोकसंख्या आहे , प्राथमिक ते उच्चमाध्यमिक विध्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण देताना अधिकाधिक विधार्थी हे ग्रामीण भागातून  येतात त्यांच्या ठिकाणी रेंज इंटरनेट नसते .२० पंचायती व एक पेडणे नगरपालिका यांचा समावेश आहे .

पेडणे तालुक्यात सरकारी प्राथमिक शाळा ६८ , अनुदानित शाळा २४ , सरकारी हायस्कूल ६ , सरकारी उच्चमाध्यमिक १ , चार अनुदानित उच्चामाधामिक अशी शिक्षण संस्था आहेत  , सरकारी शाळांमध्ये किमान १८० शिक्षक , अनुदानित हायस्कूल मध्ये १५० पेक्षा जास्त उच्चमाध्यामिक विद्यालयात १०० पेक्षा जास्त  शिक्षक आहेत हे सर्व शिक्षक विद्यादानाचे कार्य करत आहेत .


मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी प्रतिक्रिया देताना गरजवंत विधार्थ्याना गावागावात मोफत इन्टरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचा आपण संकल्प सोडला आहे , सरकार आपल्या पद्धतीने  चोफेर विचार करून योजना आखत आहे , काहीजण आपल्याला राजकीय फायदा मिळावा यासाठी सरकारवर टीका करतात , पार्से येथे पंचायत सभागृहात गरजवंत विधार्थ्यासाठी हि सेवा मोफत असेल त्याचा शुभारंभ २० रोजी केल्याचे सांगितले .

मगोचे नेते जीत आरोलकर यांनी प्रतिकिया देताना सरकारने अगोदर इन्टरनेट सेवा उपलब्ध करायला हवी होती , ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही त्याना तशी सोय करायला हवी होती , ती करताच ऑनलाईन शिकवण्या सुरु झाल्या , विधार्थ्यान्चा वेळ वाया जावू नये त्यासाठी ज्या ज्या गावात जागा उपलब्ध पंचायत करून देणार त्याठिकाणी मोफत व्हायफाय सेवा उपलब्ध करून देणार ,. जे गरजवंत आहेत त्याना हि सोय मोफत असेल असे जीत आरोलकर यांनी सांगून त्याचा शुभारंभ १९ रोजी करण्यात आला असे त्यांनी सांगितले .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: