सातारा 

‘पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ त्वरीत कमी करा’

मेढा (प्रतिनिधी) :
कोरोनाच्या महामारीत जीवनावश्यक वस्तूचे दर दिवसेंदिवस वाढत चालले असून त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. तेव्हा गॅस, पेट्रोल ,व डिझेल याचबरोबर इतर जीवनावश्यक वस्तूचे दर त्वरीत कमी करावेत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन जावलीचे तहसिलदार राजेंद्र पोळ यांचेकडे कार्यकत्यानी दिले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने उपस्थीत होते.

केंद्र शासनाच्या निर्णयामुळे दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या वस्तुंच्या दरात वेळोवेळी वाढ करणेत येत आहे. त्यामुळे  सर्वसामान्य माणसांनी आपला उदरनिर्वाह कसा करायचा हा यक्षप्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या समोरचा यक्ष प्रश्न आहे. सध्या कोरोना सारख्या महाभयंकर आजारामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे तर अनेकांचे उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत केंद्र शासनाने मात्र पेट्रोल , डिझेल, गॅस यांच्या किंमती भरमसाठ वाढवून सर्व सामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. शासनाने तात्काळ घरगुती वापराच्या  गॅसच्या  किंमती कमी कराव्यात, व वेळोवेळी वाढणारे इंधनाचे दर त्वरीत कमी करून सर्व सामान्य नागरिकांना दिलासा दयावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. असाही इशारा दिलेल्या निवेदनाद्वारे दे०यात आला आहे.

निवेदन देताना जावली पंचायत समितीचे माजी सभापती बापूराव पार्टे, सभापती मोहनराव शिंदे , उपसभापती तानाजी शिर्के, बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे , जेष्ट नेते बबनदादा वारागडे, नारायण शिंगटे, वेण्णामाईचा अध्यक्ष सुरेश पार्टे , शिवाजीराव देशमुख , प्रकाश कदम , हेमंत शिंदे , सोमनाथ कदम , धनंजय पोरे, चंद्रकांत गवळी,  दिलीप शिंदे, ​​म्रान आतार , मोहन देशमुख, धनंजय पवार , रविंद देशमुख, प्रदिप देशमुख , सतिश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: