मुंबई 

​वंचित मुलां​नी धरले शिक्षणाचे ​बोट 

​​मुंबई​ :​फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्स कंपनी लिमिटेडने सामाजिक योगदान देण्यासाठी वंचित सामाजिक घटकांमधील मुलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि लॉकडाऊनमध्ये त्यांच्यात वाचनाची आवड रुजविण्यासाठी ‘रूम टू रीड’ या एनजीओशी हातमिळविणी केली. या भागीदारीच्या माध्यमातून कंपनी महाराष्ट्रातील १२ शाळांपर्यंत पोहोचली आणि पहिली ते पाचवी या इयत्तांमधील मुलांना ३०८९ साक्षरता संचांचे वाटप केले.

या संचांमध्ये गोष्टीची पुस्तके, लेखन स्वाध्याय वह्या, लेखन साहित्य आणि अॅक्टिव्हिटी कार्ड्सचा समावेश होता. या संचाच्या मदतीने कोव्हिड-१९च्या परिस्थितीत मुलांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी मदत झाली. या साक्षरता संचांमध्ये प्रत्यक्ष परिस्थितीनुसार बदल करण्यात आले आणि समजायला सुलभ व्हावे यासाठी हिंदी आणि मराठी भाषांमध्ये हे संच वितरित करण्यात आले.

फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्सच्या चीफ मार्केटिंग ऑफिसर रुचिका वर्मा म्हणाल्या, “शिक्षण हा भविष्याचा विमा आहे, यावर आमचा दृढ विश्वास आहे. या अनपेक्षित परिस्थितीतही कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि मागास पार्श्वभूमी असलेल्या मुलांना पुस्तके वितरीत केल्याने त्यांना आपल्या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्न करण्याकरिता प्रोत्साहन मिळेल. या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना भविष्याच्या दृष्टीने सज्ज करण्यासाठी मदत करणाऱ्या रूम टू रीडचे आम्ही आभारी आहोत.”

रूम टू रीडचे कंट्री डायरेक्टर सौरव बॅनर्जी म्हणाले,”कोव्हिडच्या महामारीमुळे देशभरातील शिक्षणावर प्रचंड परिणाम झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या समस्येवर मात करण्यासाठी रूम टू रीडने अनेकविध उपाययोजना तयार केल्या आहेत. डिजिटल स्रोत उपलब्ध नसलेल्या मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी आम्ही मुलांना साक्षरता संचांच्या माध्यमातून स्वाध्याय साहित्य उपलब्ध करून दिले. प्रत्यक्ष काम करणाऱ्या सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या समन्वयाने हे संच पालकांना देण्यात आले. मुलांच्या शिक्षणासाठी मदत केल्याबद्दल आणि योगदान दिल्याबद्दल आम्ही फ्युचर जनरालीला धन्यवाद देतो.”

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: