क्रीडा-अर्थमत

जी आर इन्फ्राचा आयपीओ 7 जुलै रोजी होणार खुला

मुंबई :
जी आर इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड (जीआरआयएल ) ही इंटिग्रेडेट रोड इंजिनीअरिंग, प्रोक्युअरमेंट आणि बांधकाम (कन्स्ट्रक्शन) (ईपीसी) कंपनी आहे. त्यांना भारतातील 15 राज्यांमध्ये रस्ते/महामार्ग प्रकल्पांच्या डिझाइन व बांधकामाचा अनुभव आहे आणि अलीकडेच त्यांनी रेल्वे सेक्टरमध्येही आपल्या प्रकल्पांचे विस्तारीकरण केले आहे. त्यांच्यातर्फे बुधवार7 जुलै 2021 रोजी इक्विटी शेअर्सच्या (ऑफर”)  इनिशिअल पब्लिक ऑफरचा प्रस्ताव देण्यात आला आहे आणि ही ऑफर शुक्रवार9 जुलै 2021 रोजी बंद होईल.

या ऑफरसाठीचा प्राइस बँड रु.828 – रु.837 प्रति इक्विटी शेअर असा निश्चित करण्यात आला आहे. कंपनी आणि इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर्सनी ऑफरच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने (बीआरएलएम) अँकर गुंतवणूकदारांच्या सहभागाचा विचार केला आहेज्यांचा सहभाग बिड/ऑफर दिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारीदिनांक 06 जुलै, 2021 रोजी  असेल.

ही ऑफर 1,15,08,704 इक्विटी शेअर्सपर्यंतची (विक्रीसाठी ऑफर”) पूर्ण ऑफर असेल. या ऑफरमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या हिश्शाचा समावेश आहे.

या विक्रीच्या ऑफरमध्ये लोकेश बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 11,42,400पर्यंत इक्विटी शेअर्सजसम्रित प्रिमायसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून 127,000 पर्यंत इक्विटी शेअर्सजसम्रित फॅशन प्रायव्हेट लिमिटेडकडून 80,000 पर्यंत इक्विटी शेअर्सजसम्रित क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 56,000पर्यंत इक्विटी शेअर्सजसम्रित कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून 44,000 पर्यंत इक्विटी शेअर्सइंडिया बिझनेस एक्सलन्स फंड 1 यांच्याकडून 64,14,029 पर्यंत इक्विटी शेअर्स आणि इंडिया बिझनेस एक्सलन्स फंड यांच्याकडून 31,59,149 पर्यंत इक्विटी शेअर्स आणि प्रदीप कुमार अगरवाल यांच्याकडून 486,126पर्यंत इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे.

ऑफर ही केवळ विक्रीसाठी ऑफर असल्यामुळे कंपनीला या ऑफरमधून जमा होणारा निधी मिळणार नाही.

ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 31 सह सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन्स) नियम1957च्या नियम 19(2) नुसार देण्यात आली आहे. ही ऑफर सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या रेग्युलेशन 6(1) नुसार करण्यात आली आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात आली असून यात 50% हून अधिक ऑफर क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटपासाठी उपलब्ध नसेल आणि नॉन इन्स्टिट्युशनल खरेदीदारांना वाटप करण्यासाठी 15% हून कमी ऑफर उपलब्ध नसेल आणि रिटेल वैयक्तिक बिडर्सना वाटप करण्यासाठी 35% हून कमी ऑफर उपलब्ध नसेल.

G-R-Infraprojects-IPOकंपनीचा प्रमुख व्यवसाय हा रस्ते क्षेत्रामध्ये ईपीसी व बीओटी प्रकल्पांचे सिव्हिल बांधकाम करणे हा आहे. कंपनीने 2006 या वर्षापासून 100 हून अधिक रस्ते बांधकाम प्रकल्पांची अंमलबजावणी केली आहे. 26 जून 2021 रोजीच्या कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (आरएचपी) कंपनीच्या बीओटी प्रकल्पांपैकी त्यांचा एक ऑपरेशनल रस्ते प्रकल्प आहेज्याचे बांधकाम व विकास बीओटी (वार्षिकी) आणि एचएएमअंतर्गत कंपनीला 14 रस्ते प्रकल्प बहाल करण्यात आले आहेत. त्यापैकी 5 प्रकल्प सध्या कार्यान्वित आहेत4 प्रकल्प बांधकामांतर्गत आहेत आणि पाच प्रकल्पांचे बांधकाम अजून सुरू व्हायचे आहे. कंपनीला राज्य व राष्ट्रीय महामार्गांचे बांधकामपुललहान पुल (कल्व्हर्ट्स)उड्डाणपुलविमानतळ धावपट्ट्याबोगदे आणि रेल ओव्हर ब्रिजेस बांधण्याचाही अनुभव आहे आणि अलिकडेच कंपनीने रेल्वे क्षेत्रातही विस्तारीकरण केले आहे.

या ऑफरसाठी एचडीएफसी बँक लिमिटेडआयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेडकोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेडमोतिलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स लिमिटेडएसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेडइक्विरस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड हे बीआरएलएम आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: