गोवा 

”गार्ड’ हा आमच्या आरोग्यव्यवस्थेचा कणा’

आरोग्यमंत्री राणे यांनी दिली प्रश्न सोडवण्याची ग्वाही

पणजी : 
​’​कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘जी.ए.आर.डी’ (गार्ड) ही आमची कणा आहे. त्याच्या सोबत झालेल्या चर्चा दरम्यान आम्ही त्यांच्याकडून सूचना घेतल्या आणि त्यांचे सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावतील​,’​ अशी ​ग्वाही ​​आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली. राणे यांनी रविवारी ‘जी.ए.आर.डी असोसिएशन’चे डॉ. प्रतीक सावंत, डॉ अजय आणि इतरांशी संवाद साधून चर्चा केली.​ त्यावेळी ते बोलत होते. ​
ते पुढे म्हणाले की, त्यांच्या समस्या मान्य झाल्यामुळे त्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकार त्यांना पाठिंबा देईल आणि वेळोवेळी संघटनेच्या संपर्कात राहील.​ ​“या अभूतपूर्व काळात नागरिकांची सेवा करण्याच्या त्यांच्या निःस्वार्थ प्रयत्ना आणि समर्पणाबद्दल गोवा राज्य त्यांचे अभिनंदन करतो.” असे राणे म्हणाले.
राणे पुढे म्हणाले की, कोविड रूग्णांशी संबंधित विविध डॉक्टरांशी त्यांची भेट झाली आणि त्यांनी चर्चादरम्यान काही मुद्द्यांकडे लक्ष वेधले.​ ​आपण त्यांना आश्वासन दिलं आहे की सरकार संपूर्ण सहकार्य करेल. आम्ही एकत्र येऊन सर्व बाबींवर एकत्रितरित्या संघ म्हणून मात करू,” राणे म्हणाले​. ​
दरम्यान, कोविड रुग्णांसाठी सुरू केलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी राणे यांनी सुपर स्पेशलिटी ब्लॉकला भेट दिली. ​​

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Kindly Dont Copy !!