गोवा 

‘जीएमसीत नाही पुरेसा ऑक्सिजन पुरवठा’

डॉक्टरांच्या संघटनेने लिहिले अधिष्ठाताना पत्र

पणजीः
जीएमसीत कोविड वॉर्ड्समधला ऑक्सिजन (oxygen) पुरवठा पुरेसा नाही. सेंट्रल ऑक्सिजनचा फ्लो कधीकधी खूप कमी ऑक्सिजन फ्लो करतो आणि त्यामुळे एनआयव्ही तसंच व्हेंटिलेटर्स प्रभावीपणे काम करू शकत नाही. तसंच रुग्णांना लावलेले ऑक्सिजन सिलिंडर मध्यरात्री संपतात आणि बदलीचा सिलिंडर येण्यास किमान २-३ तास लागतात, कधीकधी त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. दरम्यान रुग्ण ऑक्सिजनशिवाय तडफडतो, असं ‘गार्ड’ने ‘जीएमसी’च्या डीनला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.गोवा असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (गार्ड)ने गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी)च्या डीनला पत्र लिहून हॉस्पिटल्समधील वाईट परिस्थितीची तक्रार केली आहे. असे अनेक गंभीर रुग्ण आहेत, ज्यांना ट्रॉली आणि फरशीवर तसंच क्रिटिकल कोविड वॉर्डमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतंय. 30 खाटांची क्षमता असलेल्या वॉर्डमध्ये 50 रुग्णांना ठेवण्यात आलंय. दर दिवशी वर्तमानपत्रातून वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यात ऑक्सिजन तसंच खाटांचा तुटवडा नसल्याची मोठमोठी वक्तव्य वाचनात येतात. आणि मग रुग्णांचे नातेवाईक कॅज्युअल्टीमधील डॉक्टर्स आणि नर्सेसना प्रश्न करतात, की जर खाटांची कमतरता नाही, तर आमच्या रुग्णाला ट्रॉली/व्हिलचेअर/जमीनीवर का झोपवलंय? आमच्या रुग्णाला ऑक्सिजन का मिळत नाहीये. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे नसतात, असं ‘गार्ड’ने पत्रात म्हटलंय.
मध्यरात्री जेव्हा ऑक्सिजन सिलिंडर संपतो, रुग्णाची अवस्था गंभीर होते, कधीकधी रुग्णाचे प्राणही जातात. अशावेळी ड्युटीवर असलेल्या ज्युनिअर डॉकर्सना रुग्णाच्या नातेवाईकांच्या संतापाला सामोरं जावं लागतं. अशावेळी रुग्णाच्या नातेवाईकांचा राग ड्युटीवर असलेल्या रेसिडेंट डॉक्टरवर निघतो. रुग्णाला वाचवण्यासाठी आमची आमचं 100 टक्के देतो, तरी आम्हाला ही अपमानास्पद वागणूक का? असा प्रश्न ‘गार्ड’ने पत्रात केलाय.
oxygenनवीन कोविड सुविधा सुरू करत असल्याचं रोज सांगितलं जातंय. पण प्रत्यक्षात मात्र नवीन स्टाफ किंवा डॉक्टर्सची नियुक्ती अद्याप झालेली नाही. एसजीडीएच, ईएसआय आणि जीएमसी व्यतिरिक्त आम्ही या अतिरिक्त सुविधांचं व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे का? असा प्रश्न ‘गार्ड’ने केलाय. सध्या एक डॉक्टर 30 हून अधिक रुग्णांची काळजी घेतोय, तर काही डॉक्टर्स हे 24 तासांची शिफ्ट करत आहेत. त्यांना अधिक काम करायला लावणं हीच प्रशासनाची पुढील योजना आहे का?” असा सवालही ‘गार्ड’कडून उपस्थित करण्यात आलाय.
कृपया आमच्या समस्यांकडे लक्ष द्या आणि आम्हाला फक्त तोंडी आश्वासनं नकोत, त्वरित कृती करण्याची गरज आहे, नाहीतर काहीतरी विनाशकारी घडू शकतं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या त्रुटी मान्य करण्याचं आवाहन करतो, जेणेकरून रुग्णांना रुग्णालयात आल्यावर काय अपेक्षा करावी हे कळेल, असं आवाहन ‘गार्ड’कडून करण्यात आले आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: