गोवा 

‘गोंयकरांना स्वतःचे घरापासून परावृत्त करण्यासाठीच ‘हा’ निर्णय’

पणजी :

75 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या मालमत्तांच्या खरेदीसाठी नोंदणी फी वाढवल्याबद्दल आम आदमी पक्षाने भाजप सरकार वर टीका केली आहे.गोवेकरांना स्वतःच्या घराच्या मालकी हक्कापासून परावृत्त करण्यासाठी भाजप सक्रियपणे प्रयत्न करीत असल्याचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, बहुतेक गोमंतकीयांना त्यांच्या पहिल्या घरासाठी गुंतवणूक करायची किंवा त्यांच्या व्यवसायासाठी छोट्या व्यावसायिक जागा खरेदी करावयाच्या आहेत, त्यासाठी साधारण रु 75 लाख खर्च केला जातो.

“उद्योग संस्था क्रेडाई यांनी उघडपणे सांगितले आहे की राज्य  सरकारच्या भ्रष्टाचारामुळे रिअल इस्टेटच्या खर्चामध्ये 80 % वाढ होते.प्रोजेक्ट पूर्णपणे कायद्यानुसार असेल तरीही प्रत्येक परवानगी आणि मंजुरीसाठी लाच देण्याची आवश्यकता असते.वाळू आणि मुरूम-दगड काढणे हा व्यवसाय भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. मुख्यमंत्री डॉ सावंत हे भ्रष्टाचार कमी करणार नाहीत ​पण सामान्य गोमंतकियांवर करांचे अधिक ओझे टाकण्यापूर्वी मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी एकदाही विचार केला नाही.

मुद्रांक शुल्क आणि नोंदणी दर सहसा अर्थसंकल्पाच्या वेळी ठरविले जातात असे सांगत म्हांबरे म्हणाले की, सदर दर वाढविण्याचा निर्णय घेण्याची वेळ शंकास्पद आहे.

“अलिकडच्या अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधावरील  कर कमी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.  परंतु नोंदणी फी वाढविण्याचा हा अचानक घेतलेला निर्णय म्हणजे यू टर्न होय.कायदा मंत्री काब्राल आणि मुख्यमंत्री डॉ सावंत यांना बाजारातील गतिमानतेची माहिती नाही. कर वाढविणे म्हणजे नेहमीच महसुलात वाढ होत नाही, तर रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रात प्रतिकूल परिणामकारक ठरू शकतात ”, असे म्हाम्बरे म्हणाले.

रिअल इस्टेटमधील मागणीला चालना मिळावी यासाठी दिल्लीतील आप सरकारने मालमत्ता नोंदणीसाठी सर्कल दर कमी केले असून शेजारच्या महाराष्ट्र सरकारने नोंदणी शुल्क कमी केले असल्याची माहिती म्हांबरे यांनी दिली.

“आम्ही मुख्यमंत्र्यांनी कोविडशी संबंधित नुकसान भरपाई आणि आर्थिक सवलतींबद्दलच्या अनेक घोषणा ऐकल्या, पण अद्याप एकही गोमंतकीयाला एक रुपयाही मिळालेला नाही.मुख्यमंत्री सावंत यांनी वाढीव कराच्या स्वरुपात गोवेकरांकडून अधिक पैसे घेण्याचे कामकेले आहे, असा आरोप ​​ म्हाम्बरे यांनी ​केला. ​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: