गोवा 

‘सरकार कसे करणार आहे गोमंतकियांचे रक्षण?’

गोवा आपने विचारला राज्य सरकारला थेट प्रश्न

पणजी :
प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातील गोवा सरकारने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेशी लढा देण्याची आणि गोयंकरांच्या लेकरांच्या संरक्षणाचा सखोल आराखडा जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने आज केली.  प्रमोद सावंत यांनी अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे गोव्याच्या जनतेसमोर आपली संपूर्ण योजना स्पष्ट करावी. कारण कोरोनाच्या तिसरी लाट, जी की मुलांसाठी सर्वात धोक्याची मानली जात आहे, त्याला सामोरे जाण्याची योजना दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी आधीच उघड केली आहे.

केजरीवाल सरकारने कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी 300 मेट्रिक टन ऑक्सिजन प्लांट स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांचे ऑडिट करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाची घोषणा केली गेली आहे.  महत्त्वाचे म्हणजे केजरीवाल सरकारने कोरोनामुळे फक्त मुलांवर होणाऱ्या अपेक्षित परिणामांचा सामना करण्यासाठी एक टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या विशेष टास्क फोर्समध्ये बालरोग तज्ञ, इतर तज्ञ आणि वरिष्ठ आय.ए.एस. अधिकारी असतील.

आम आदमी पार्टीचे गोवा राज्यसंयोजक राहुल म्हांबरे यांनी मागणी केली  की, “सावंत सरकारने देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून गोयंकरांच्या आणि विशेषत: मुलांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठीचा कृती तथा योजना आराखडा जाहीर करावा.”

सावंत सरकारचे दुसर्‍या लाटेतील कामकाज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पटलावर आले कारण गोव्यात अजूनही देशात सर्वाधिक कोरोना बाधेचा दर आहे.  रात्री उशिरा झालेल्या घटनेत लोकांनी सरकारच्या गैरव्यवस्थेमुळे उद्भवलेल्या ऑक्सिजनच्या संकटामुळे आपला जीव गमावला म्हणून यावर न्यायालयाने देखील संताप व्यक्त केला .  दुसर्‍या लाटेसाठी PHC ची पूर्वतयारी नसल्याचे आढळून आल्याने सध्या बरेच नागरिक विचारात पडले आहेत.

​​“दुसर्‍या लाटेला हाताळताणाचे गैरव्यवस्थापन  पाहता, आपल्याला तिसर्‍या लाटेसाठी अधिक तयार असणे आवश्यक आहे. आपल्याला आता पुन्हा गोयंकरांचा जीव गमावणे परवडणारे नाही. सावंत यांनी आपल्या तज्ज्ञ समितीचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यांच्या सूचनांप्रमाणे पाऊले उचलावीत आणि केजरीवाल सरकार प्रमाणे चांगले काम करावे” असे म्हांबरे यांनी म्हटले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: