गोवा 

‘आप’ने केला सत्तरीमधील पूरग्रस्त गावांचा दौरा

​सत्तरी :
गोव्यात पूर ओसऱ्याल्यानंतर दुसर्‍याच दिवशी गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांच्या नेतृत्वात ‘आप’ च्या पथकाने पूरग्रस्तांचे आकलन करून त्यानुसार मदत करण्यासाठी सत्तरी व वाळपई येथे मार्गक्रमण केले. आम आदमी पक्षाने तातडीने कार्यवाही केली आणि पूरग्रस्तांना रेशन व इतर आवश्यक वस्तू पुरवण्यास सुरवात केली.

खेड्यांमध्ये शासकीय यंत्रणेची पूर्णत: मोडतोड झाली आहे. याला पूर्णतः प्रमोद सावंत  दोषी आहेत, ते पोकळ आश्वासन देऊन दिल्लीत पक्ष हाय कमांड सोबत व्यस्त होते आणि आयएमडीच्या केशरी इशाऱ्या नंतरही गावे सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी कोणतीही खबरदारी घेतली नाही. यामुळे घरे, शेतजमीन आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आपने म्हटले आहे.

उसगाव, गंजे व दामशे या गावांना राहुल म्हांबरे यांनी भेट दिल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे हे,उघडकीस आले. शिवाय तेथे कोणतेही सामुदायिक केंद्र किंवा बाधित व्यक्तींसाठी अन्न किंवा पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. आम आदमी पार्टीने तातडीने कार्यवाही केली आणि जे लोक प्रभावित झाले त्यांच्यासाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.

ग्रामस्थांशी बोलताना उघडकीस आले की, सरकारने आयएमडीकडून केशरी इशारा देण्यात आल्याचे त्यांना कळवले नव्हते. अनेक ग्रामस्थांनी सांगितले की जर त्यांना इशारा देण्यात आला असता आणि सुरक्षित राहण्यास सांगितले असते, तर बरेच नुकसान टाळले जाऊ शकले असते. अग्निशामक यंत्रणेद्वारे किंवा सक्षम अधिकाऱ्यांद्वारे संरचनेची तपासणी केल्याशिवाय बर्‍याच घरांमध्ये परत जाणे खूप धोकादायक आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपत्तीनंतरही सामुदायिक केंद्र नसल्यामुळे राहण्याची व्यवस्था झालेली नाही.

पूरग्रस्त लोक त्यांच्या नातेवाईकांच्या आणि शेजारच्या गावांच्या दयाळूपणावर अवलंबून आहेत. जे काही दिसून येत आहे, त्यावरून ही  सरकारकडून केली गेलेली मानवनिर्मित आपत्ती आहे, हे स्पष्ट होते.

आप गोवा संयोजक म्हांबरे म्हणाले. “शेतीची जमीन नष्ट झाली आहे तसेच घरातील सर्व वस्तू तसेच घरांचे नुकसान झाले आहे. बहुतेक गोंयकरांसाठी ही त्यांची जीवनाची बचत होती.केशरी इशाराबद्दल ग्रामस्थांना वेळीच इशारा देण्यात आला असता, तर हे नुकसान पूर्णपणे कमी केली जाऊ शकले असती”,म्हांबरे म्हणाले.

म्हांबरे यांच्या व्यतिरिक्त आपचे प्रवक्ते वाल्मीकि नाईक आणि नेते शुभम शिवोलकर आणि पुजन मालवणकर यांच्या नेतृत्वात पथकांचे नेतृत्व करण्यात आले. आप गोव्याचे सहसंयोजक सुरेल तिळवे आणि नेते संदेश तेलेकर देसाई यांनीही पोंडाच्या आसपासच्या खेड्यात व भागात आपच्या पथकांचे नेतृत्व केले केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: