गोवा 

‘आप देणार घरपोच जीवनावश्यक सुविधा’

पेडणे (प्रतिनिधी) :
कोरोना महामारीच्या संकटाचा आम्हाला सर्वाना सामना करावा लागत आहे , घरात आम्हाला सुरक्षित राहून जीवन जगायचे आहे . कामाशिवाय कुणीही बाहेर पडू नये , जे जे नियम आहेत ते सर्वांनी पाळणे पाहिजे . या काळात आमआदमी पार्टीचे कार्यकर्ते जीवनावश्यक सुविधा , आरोग्य सुविधा घरापर्यंत पोचवणार असल्याचे आम आदमी पक्षाचे मांद्रे मतदार संघाचे नेते वकील प्रसाद शहापूरकर यांनी , तुये येथे हेल्पलाईन रेशन धान्य वितरीत कार्यक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर सांगितले .

वकील प्रसाद शहापूरकर यांनी पुढे बोलताना तुये गावात सर्वात प्रथम रेशन हेल्पलाईन सुरु केली आहे . ती पूर्ण मतदारसंघात राबवणार असल्याचे सांगितले . तुये येथे कृष्णा राऊत यांच्या निवास्थानी नागरीकांकासाठी ऑक्सिजन तपासणी केंद्र सुरु केले आहे . शिवाय डॉक्टरांची हेल्पलाईन सेवा पक्षातर्फे राबवण्यात आली आहे . आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोचवणे  त्याचे मनोधैर्य  वाढवणे हा उद्देश असल्याचे शहापूरकर म्हणाले.

aap goa

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: