गोवा 

मांद्रे मतदारसंघांत होणार भाजपा विरुद्ध भाजपा लढत ?

पेडणे [ निवृत्ती शिरोडकर ] :

पोटनिवडणुकीत मला तुम्ही निवडून दिले तर तुमच्या आमदाराला मंत्रिपद मिळणार ,आणि त्याच बळावर आम्ही विकास करुया असे ठोस आश्वासन मान्द्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी पोटनिवडणुकीत दिले होते . ते निवडूनही आले , मात्र भाजपने त्याना मंत्रिपदासाठी हुलकावणी दिली .

आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी दिग्गज राजकर्त्यांना युवा मगोचे नेते जीत आरोलकर आणि कॉंग्रेसचे जीत आरोलकर व गोवा फॉरवर्ड चे दीपक कलंगुटकर आदींनी स्थानिक आमदार दयानंद सोपटे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे . मांद्रे मतदार संघातून भाजपाचे आमदार दयानंद सोपटे याना टक्कर देण्यासाठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकान्त पार्सेकर , माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप , मगोचे जीत आरोलकर , कॉंग्रेसचे सचिन परब व गोवा फॉरवर्ड दीपक कलंगुटकर आदींनी आता पासूनचे जोरदार मोर्चेबांधणी करायला सुरुव्बात केली आहे . या निवडणुकीत हरमल जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर व धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे . मांद्रे मतदार संघातील राजकारणात आजही भाजपचा जुना गट आणि आमदार सोपटे यांचा गट या दोन गटात अडकले आहे , भाजपा विरुद्ध भाजपा असे राजकारण या मतदार संघात चालू आहे ,मात्र सध्यातरी आमदार दयानंद सोपटे यांचेच या मतदार संघात वर्चस्व आहे ,सरळ लढत झाली तर चमत्कार घडू शकतो मात्र तिघांच्या भांडणात आमदार सोपटे यांचा लाभ झाला हे दोन निवडणुकीत चित्र दिसले, त्याचीच पुनरावृत्ती आताही घडू शकते.

आमदार दयानंद सोपटे यांच्यासमोर सध्या मगोचे जित आरोलकर आणि काँग्रेसचे सचिन परब यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे . हे आव्हान पेलण्यासाठी आमदार दयानंद सोपटे यांचे समर्थक आणि पक्षीय संघटनेच्या कार्याची बांधणी मजबूत असल्याने कितीही वादळे आले तरी आमदार सोपटे समर्थपणे पेलताना दिसत आहे .कारण त्यांना मागच्या 25 वर्षाच्या राजकारणाचा अनुभव आहे ,आमदारकी सोडूनही ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षच्या चिन्हावर निवडून येऊ शकतात ,पक्षापुढे व्यक्ती मोठी नाही हे भाजपाने या अगोदरच दाखवून दिले ज्यांनी पक्षाध्यक्ष असताना राज्यात दोन वेळा भाजपचे सरकार आणले त्या तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर यांनाही पक्षाने किंमत दिली नाही ,2019 च्या पोट निवडणुकीत तत्कालीन भाजपच्या चिन्हावर तीन वेळा निवडून येऊन मुख्यमंत्री बनलेले प्रा. लक्ष्मिकान्त पार्सेकर यांना विश्वासात न घेता सोपटे यांना प्रवेश दिलाच शेवटी उमेदवारी देऊन सुद्धा त्यांना आमदार मतदारांनी दुसऱ्यादा केले ,त्यावेळी माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांच्या गटाने पार्सेकर यांना बंडखोरी करून निवडणुकीत उभे राहण्याची गळ घातली दबाव घातला ,कार्यकर्त्यांच्या हट्टापायी एक सभा घेतली त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आणि पार्सेकर यांनी जाहीर केले की योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे जाहीर केले आणि शेवटच्या क्षणी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि जुन्या भाजपा कार्यकर्त्यांना मोठा धक्का दिला ,जुन्या कार्यकर्त्यांना कोणी वालीच मिळाला नाही . जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे माजी जिल्हा सदस्य आणि पार्सेकर यांचे कट्टर समर्थक अरुण बानकर याच्या नावाची साधी शिफारस केली गेली नाही ,त्याच वेळी मांद्रेत भाजपा विरुद्ध भाजपा असे राजकारण सुरू झाले .

2019 च्या पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले जित आरोलकर यांना पार्सेकर गटाचा पाठिंबा मिळाला होता त्यातील दीपक कलांगुटकर यांनी पक्षाला राम राम करत गोवा फॉरवर्ड ला साथ देऊन हातात नारळ घेतला त्यामुळे आगामी निवडणुकीत तेच गोवा फॉरवर्डचे उमेदवार असणार आहे तशी घोषणा पक्षाचे सर्वेसर्वा आमदार विजय सरदेसाई यांनी घोषित केले .

आमदार दयानंद सोपटे यांच्या विरोधात मगोचे जित आरोलकर काँगेसचे सचिन परब आणि गोवा फॉरवर्डचे दीपक कलांगुटकर हेच संभाव्य उमेदवार म्हणून सध्या तरी चर्चेत आहे .

आमदार दयानंद सोपटे हे 2012 च्या विधानसभेच्या निवडणुका पूर्वी पेडणे भाजपा आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस मध्ये दाखल झाले आणि मांद्रे मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळवली तिथे ते स्वकीयकडून पराभूत झाले , मध्यंतरी काळात सोपटे यांनी भाजपात येण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मुख्यमंत्री पार्सेकर असताना सोपटे यांना पुन्हा भाजपात येण्यासाठी विरोध केला. सोपटे जर भाजपात येत असेल तर दीपक कलांगुटकर यांनी हिरवा कंदील द्यायला हवा ,पर्रिकरांच्या आणि पार्सेकर यांच्या काळात दीपक किती मोठा होता याची प्रचिती आली ,मात्र आपल्याला विरोध होतानाही सोपटे यांनी आपला पराभव मान्य करत 2017 च्या निवडणुकीत परत एकदा काँग्रेसची उमेदवारी घेतली आणि मुख्यमंत्री पदावर असताना सोपटे यांनी पार्सेकर यांचा पराभव करून राजकारणातला इतिहास घडवला.

आणि नंतर 2019 साली पुन्हा एकदा काँग्रेसच्या आमदारकीचा त्याग करत भाजपात सोपटे यांनी प्रवेश केला आणि त्याकाळात ते आमदारही झाले.

माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांच्याकडे संपर्क साधला असता कॉंग्रेस पक्षाची काहीधेय्य धोरणे नियम आहेत त्याचे पालन केले जाते. आता पर्यंत आपला राजकीय प्रवास मांद्रे मतदार संघातील जनतेला आहे आपण राजकारणातून अजून वयोवृद्ध झालो नाही , आपल्याला आजही मतदार संघातून मतदारांचा पाठींबा आहे . पक्ष आपल्यालाच उमेदवारी देणार असा दावा माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप यांनी केला

तर मगोचे नेते आणि मांद्रे माजी सरपंच राघोबा गावडे यांनी प्रतिक्रिया देताना पेडणे तालुका हा मगो पक्षाचा बालेकिल्ला आहे , कोणत्याही राजकीय पक्षाने जरी मगो पक्षाकडे युती केली तरीही मांद्रे आणि पेडणे या दोन्ही मतदारसंघात मगोचेच उमेदवारासाठी जागा आरक्षित असणार असा दावा करून मान्द्रेत मगोचे उमेदवार जीत आरोलकर याना मिळत असलेला पाठींबा त्याना मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे सचिन परब यांनी प्रतिक्रिया देताना पक्षाचे कार्य कठीण प्रसंगी हल्ली मांद्रे मतदार कार्य तळागाळात कोणी पोचवले यांची जाणीव मतदाराना आहे . त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला .

माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी प्रतिक्रिया देताना मान्द्रेतील जनतेने लोकशाहीच्या मार्गातून पाच वर्षासाठी आपला आमदार निवडून आणलेला आहे , त्यामुळे पाच वर्षे त्याना काम करू दे , त्यात आपण कधीही खो घालत नाही , पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण परत नव्या जोमाने निवडणुकीच्या तयारीला लागणार आहे . २०१७ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकीत त्या आमदारासोबत कार्यकर्त्ये होते तेच कार्यकर्त्ये आजही आपल्याकडे येवून निवडणुकीसाठी गळ घालत आहे. आपण त्याना सांगितले पाच वर्षे आमदाराला काम करू द्या , आगामी निवडणुकीत पक्ष आपल्याला उमेदवारी देणार असा विश्वास व्यक्त करून ,आपला पुढील पाच वर्षाचा काळ पेडणे तालुक्यासाठी आणि पर्यायाने मांद्रे मतदार संघासाठी देणार आहे . आपल्या कारकिर्दीत जे प्रकल्प आणणे ते मार्गी किंवा पाठपुरावा झाला नाही त्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली .

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: