गोवा 

मुख्यमंत्र्यांनी केला ‘अनुलोम विलोम’

पणजी: 
जागतिक योग दिनाचे औचित्य साधत राज्य सरकारच्यावतीने आगवाद किल्ल्यावर योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपली विशेष उपस्थिती नोंदवली.

दरम्यान, कोविड महामारीच्या काळामध्ये प्रत्येकाने शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व तंदुरुस्त राहणे आवश्यक आहे. यासाठी उद्या 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त प्रत्येकाने दिवसभरातील धावपळीतून काही वेळ बाजूला काढून योगासने करावीत. जे घरी असतील त्यांनी घरी, जे कामावर असतील तरी कामाच्या ठिकाणी पुरेसे शारीरिक अंतर पाळून योगासने करावीत. नियमितपणे योगासने केल्यास या महामारीच्या काळातही आपण सर्वजण निरोगी राहू शकतो, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

yoga day yoga day

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: