गोवा 

​हळदोण्यात नागरिकांना किराणा​, मास्क​, सॅनिटायझर्स वितरीत

पणजी ​:

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त हळदोणे युवक कॉंग्रेसने शनिवारी ५० कुटुंबांना किराणा सामान पुरविले आणि १०० पेक्षा जास्त लोकांना सेनिटायझर्स व मास्कचे वाटप केले.

कॉंग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, हळदोणे गट कॉंग्रेसचे अध्यक्ष अश्विन डीसोझा, हळदोणे  यूवक कॉंग्रेसची  सदस्या निची  करापूरकर, मनीष लिंगुडकर, साईशा बागकर, कोमल जाधव, विठ्ठल आरोंदेकर, प्रणव फडटे, निखिल पेडणेकर, शैलेश कोरगांवकर आदी उपस्थित होते.

भारतीय युवा कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय स्तरावर बी व्ही श्रीनिवास यांच्या नेतृत्वा खाली  हा कार्यक्रम पार पडला आणि गोव्यात गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. वरद म्हार्दोळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना अमरनाथ पणजीकर यांनी राहुल गांधी यांच्या कामगिरीबद्दल आणि कॉव्हिडच्या या कठीण वेळी लोकांना मदत देण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल त्यांचे कौतुक केले. “मानवतेची सेवा करणे हे आमचे ध्येय असले पाहिजे. आमचे नेते राहुल गांधी हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत.” असे पणजीकर म्हणाले. “राहुल गांधींनी आपला वाढदिवस साजरा केला नाही, त्याऐवजी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना लोकांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले.” असे ते म्हणाले.

“युवा कॉंग्रेसच्या कार्यांबद्दल मला अभिमान वाटतो, जे गेल्या अनेक दिवसांपासून कोविड रूग्ण, त्यांचे नातेवाईक आणि ज्यांना लॉकडाऊनच्या वेळी जेवण मिळू शकले नाही अशा लोकांसाठी मदत करत आहेत. या तरुणांनी अशा कठीण काळात समाजाला मदत करण्याचे उदाहरण ठेवलेआहे. ” असे पणजीकर म्हणाले.

गट अध्यक्ष अश्विन डीसोझा  यांनी स्वागत केले तर आभार  साईशा बागकर यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: