गोवा 

‘खाण व्यवसाय, ऑक्सिजन अभावाने झालेले कोविडचे मृत्यू, भ्रष्टाचार, बरोजगारी व दिवाळखोरी यावर अमित शहा गप्प का?’



पणजी :

गोव्याचा “कल्पनेपलीकडचा कायापालट करूट अशी केंद्रीय गृह मंत्र्यांनी केलेली घोषणा म्हणजे गोव्याचे कोळसा हब, ड्रग माफीया केंद्र तसेच गुन्हेगारांचे आश्रयस्थान करण्याची नांदी असुन, गोव्याची अस्मिता नश्ट करण्याचा हा गुन्हेगारी पार्श्वभूमी लाभलेल्या तसेच तडीपार झालेल्या अमित शहांचा एक प्रकारे गोमंतकीयांना इशाराच आहे अशी बोचरी टीका कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली.



आज कॉंग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत गिरीश चोडणकर यांनी गृहमंत्री अमित शहा यांनी काल केलेल्या पुर्ण बहुमताने सत्तेत आल्यास गोव्याचा कायापालट करण्याच्या केलेल्या घोषणेचा समाचार घेत भाजपवर जोरदार पलटवार केला. पत्रकार परिषदेला कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो, माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर व माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस हजर होते.



गोव्याचे कोळसा हब, गुन्हेगारांचे आश्रय स्थान तसेच ड्रग माफीया केंद्र करण्याचा भाजपचा डाव असुन, राज्याचे पर्यावरण नश्ट करुन गोव्याची अस्मिता संपवण्याचा भाजपचा कुटील डाव आहे. मोदींच्या क्रोनी क्लबला गोवा दान देण्याचा डाव भाजप खेळत आहे असा दावा गिरीश चोडणकर यांनी केला.



आज देशात इंधनाचे वाढणारे दर तसेच जीवनावश्यक वस्तुंचे वाढणारे भाव यासाठी केवळ भाजप सरकार जबाबदार आहे. आता फेक माहितीवर लोकांना फसविणे भाजपला शक्य होणार नाही. अमित शहांना गोव्याच्या समस्यांवर बोलण्यापेक्षा निवडणुकांवर बोलणे महत्वाचे वाटले. भाजपने विकास केला असता तर अमित शहांना मतांची भिक मागण्यासाठी गोव्यात यावे लागले नसते असा टोला आमदार आलेक्स रोजिनाल्ड लॉरेंन्सो यांनी यावेळी हाणला.



गोव्याची जीवनदायीनी आई म्हादईचा राजकीय स्वार्थासाठी कर्नाटकशी सौदा केल्यानंतर आता गोव्यातील नद्यांचे मोदींचे उद्योजक मित्र अदानी-अंबानीकडे सर्व नद्या देण्याचा बेत भाजपने आखला आहे. लोक भावनांचा आदर न करता भाजप नावशी येथे मरिना प्रकल्प सुरू करणार आहे. आमच्या खारवी बांधवांच्या घरावर संकट आणुन पोर्ट लिमीट वाढवुन मच्छीमारांना भाजप सरकार रस्त्यावर आणणार आहे. किनारी व्यवस्थापन आराखड्यात भानगडी करुन गोव्याची किनारपट्टी भाजप आपल्या उद्योजक मित्रांना देणार आहे.


गृहमंत्री अमित शहा यांनी खाण व्यवसाय, ऑक्सिजनच्या कमतरतेने झालेले कोविड मृत्यू, कोलमडलेली इंटरनेट व्यवस्था, दिवाळखोरी व बेरोजगारी यावर भाष्य करण्याचे का टाळले हे भाजपने लोकांना स्पष्ट करावे अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली.


गोव्यात वाढती बरोजगारी थांबविण्यास भाजप सरकारला आलेले अपयश, तसेच प्रशासनात बोकाळलेला भ्रष्टाचार यावर अमित शहा गप्प राहीले. गोवा लोकायुक्तांनी चौकशीचे आदेश दिलेला २१ भ्रष्टाचार प्रकरणाचे काय झाले हे अमित शहांनी लोकांना सांगावे. भाजप पदाधिकाऱ्याच्या कारखान्यात सापडलेले कॅटामायन ड्रगची चौकशी कुठवर आली हे भाजपने सांगणे गरजेचे आहे.


गोव्याला आदर्श राज्य करण्याचे अमित शहा यांचे आश्वासन म्हणजे एक “जुमला” आहे. मागिल दहा वर्षात गोव्याचा विकास करण्यास सरकार का अपयशी ठरले? भाजपचे मुख्यमंत्री, मंत्री आमदार स्वताची पोळी भाजुन घेण्यात व्यस्त राहिले व त्यामुळेच गोवा आज दिवाळखोर झाला व गोमंतकीय प्रचंड दबावाखाली असल्याचे गिरीश चोडणकर म्हणाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: