गोवा 

”हि’ तर भाजप सरकारविरोधातील ​नवक्रांतीचीच सुरुवात’

​मडगाव :
भाजपा सरकारने अत्यंत बेजबाबदार वागणुकीमुळे देशात आर्थिक आणिबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करून प्रत्येक नागरिकाला कर्जाच्या दुष्टचक्रात ढकलले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष या सरकारने वाढवलेल्या महागाईविरोधात लढा देणार असून, आजची निषेधात्मक सायकल रॅली हि भाजपसरकारविरोधातील नवक्रांतीचीच सुरुवात आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.
पेट्रोल प्रति लिटर ६० रुपये राहील असे आश्वासन देत भाजप सरकारने २०१२ मध्ये सत्ता काबीज केली पण आज गोव्यात पेट्रोल शंभरीला पोहोचले असल्याचे यावेळी दिगंबर कामत यांनी निदर्शनास आणून दिले.
मडगाव येथील ऐतिहासिक लोहिया मैदानावर राम मनोहर लोहिया यांच्या पुतळयाला वंदन करून काँग्रेसने आपल्या महागाईविरोधातील आपल्या निषेधात्मक विशाल सायकल रॅलीला प्रारंभ केला. यावेळी गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो, नुवेचे माजी आमदार अलेक्स सिकेरा,  काँग्रेसचे उपाध्यक्ष अल्तिनो गोम्स, द. गोवा काँग्रेस अध्यक्ष जो डायस, मडगाव काँग्रेस विभाग अध्यक्ष गोपाळ नाईक, मडगाव पालिकेच्या उपाध्यक्षा दीपाली सावळ आदी मान्यवरांसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. हि सायकल रॅली दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढण्यात आली.
विविध करांचा अधिभार लावून इंधन दरवाढ केल्यामुळे भाजप सरकार सर्वार्थाने जनतेला लुटण्याचेच काम करत आहे. जनतेकडून लुटला जाणारा हा सगळं पैसे नेमका जातोय कुठे? असा रोकडा सवाल यावेळी गिरीश चोडणकर यांनी विचारला.

कोविडच्या काळात जनतेला सोसाव्या लागलेल्या त्रासाची कल्पना भाजप सरकारला अजिबातच दिसत नाही. जनतेची थोडी जरी काळजी असेल, तर सरकारने केलेली इंधन दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी आग्रही मागणी यावेळी लुईझिन फालेरो यांनी केली.
​वारंवार केली जाणारी इंधन दरवाढ हि भाजप सरकारच्या असंवेदनशीलपणाचेच ​द्योतक आहे. सर्वसामान्य जनतेच्या सुख-दु:खासोबत आपले कसलेही नाते नाही हेच यातून भाजप सरकार सांगत आहे, असे यावेळी जो डायस यांनी नमूद केले.
महागाईविरोधात गोवा काँग्रेसने आयोजित केलेली ​आजची निषेधात्मक ​सायकल रॅली हि काँग्रेसच्या मोदी सरकारविरोधातील राष्ट्रीय निषेध कार्यक्रमाचा भाग असून, आजच्या या तिसऱ्या निषेध मोर्चापूर्वी महिला आणि युवा काँग्रेसच्यावतीने ८ जुलै रोजी सांखळी, डिचोली, वाळपईमध्ये ‘ढोल वादन’ करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सांखळीमध्ये ९ जुलैरोजी बैलगाडी रॅली काढून महागाईचा निषेध नोंदवला होता. जोपर्यंत सरकार हि इंधनवाढ आणि  दरवाढ मागे घेत नाही तोवर राज्यभरात असे निषेध कार्यक्रमाचे घेण्यात येतील असे यावेळी अल्तिनो गोम्स यांनी सांगितले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: