गोवा 

‘आम्ही 40 मतदारसंघात लढण्यास तयार’

पणजी:
गोव्यातील सर्व मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे कार्य वाढलेले असून, येणाऱ्या निवडणुकीत 40 जागा देखील लढण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज आहे. तरीसुद्धा इतर पक्षांच्या नेत्यांशी भेटून युतीबाबत चर्चा करण्यास आपण तयार आहोत. अशी माहिती निवडणूक निरीक्षक व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. तसेच मी इथे प्रदेश अध्यक्ष बदलण्यासाठी आलेलो नसून, निवडणूक निरीक्षक म्हणून आलेलो आहे. असे त्यांनी नमूद केले. गोवा दौर्‍यावर असलेले चिदंबरम यांनी आज दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिनेश गुंडुराव व स्थानिक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी वरील निवेदन केले. कुठल्याही इतर नेत्यांना पक्षात घेताना, उमेदवारी देताना स्थानिक सक्रिय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यात येईल. त्या 10 फुटीर आमदारांना पक्षात घेण्यासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली जाईल. असेही त्यांनी सांगितले.

विद्यमान सरकार चे काम वाईट असल्यामुळे आणि त्यांच्यावर लोकांचा विश्वास नसल्यामुळेच या पक्षाला अनेक दिवसापूर्वी प्रचार करावा लागतोय. असे सांगून काँग्रेसचे उमेदवार ठरवताना त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी शक्यतो लवकर उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्याने सांगितले. प्रदेशाध्यक्ष बदलण्यासाठी इथं आलेलो नाही असे सांगून गिरीश चोडणकर यांना चिदंबरम यांनी एक प्रकारे अभयच दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: