google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘काँग्रेसच्या नवीन आमदारांची कामगिरी अभिमानास्पद’

पणजी :

गेल्या विधानसभा अधिवेशनातील आपल्या परिपक्वतेवर आधारीत कामगिरीबद्दल गोव्यातील संपादक, विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि गोमंतकीयांकडून कौतुकाचे शब्द व शाबासकी मिळवीलेल्या काँग्रेसच्या नवीन आमदारांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या कामगिरीचा काँग्रेस पक्षाला सन्मान वाटतो. आमचे सर्व आमदार यापुढेही गोव्याचा आवाज बनुन काम करीत राहतील असा आम्हाला पुर्ण विश्वास आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केले.

आमचे नवीन आमदार संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, एल्टन डिकोस्टा, अॅड. कार्लोस अल्वारेस फरेरा, रुडॉल्फ फर्नांडिस आणि इतरांनी त्यांचे मतदारसंघ आणि गोव्याशी संबंधित अनेक मुद्दे प्रभावीपणे विधानसभेत मांडले. त्यांच्या या कामगिरीचे गोमंतकीयांनी चांगलेच कौतुक केले असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

आमचे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांचा “कुंकळ्ळी लढ्यावरील” खाजगी सदस्य ठराव गोवा विधानसभेने एकमताने स्वीकारला. “विधवा भेदभाव” या विषयावरील त्यांची ‘लक्षवेधी सुचना’ सभापतीनी ‘शुन्य प्रहराला’ विचारात घेतली, तरिही त्याचे महिला संघटनांसह गोव्यातील लोकांकडुन चांगलेच कौतुक झाले. अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले की, कुंकळ्ळीच्या आमदारांनी मांडलेल्या ‘घोस्ट एअरपोर्ट थिअरी’चा अनेक संपादकीय तसेच टेलिव्हिजन चर्चासत्रांत उल्लेख झाला.

केपेंचे आमदार एल्टन डिकोस्टा यांनी “तीन रेषीय प्रकल्प रद्द करणे” आणि “आंदोलकांवरील खटले मागे घेण्याची” मागणी करणारा ‘खाजगी सदस्य ठराव’ मांडला. त्यांच्या ठरावाने गोव्यातील जनतेला गोव्याचे रक्षण करण्यास वचनबद्ध असलेले आमदार आणि गोव्याचे रक्षण करण्याचे नाटक करणाऱ्या आमदारांचे खरे चेहरे दाखवून दिले, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी आक्रमकपणे भुमीका घेत कोळसा वाहतुकीवरून मिळणाऱ्या महसूलावर सरकारला धारेवर धरले. गोव्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगार देण्यात सरकारचे अपयश संकल्प आमोणकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उघड केले असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.

हळदोणाचे आमदार अॅड. कार्लोस आल्वारीस फरेरा यांनी सरकारला प्रश्न विचारताना आणि सरकारकडून सुधारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन मिळवीताना आपले राजकीय आणि कायदेशीर कौशल्य दाखवले.

आमचे सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी आपल्या मतदारसंघाशी संबंधित प्रश्न तसेच ऑल्ड गोवा येथिल वारसा स्थळावरील बेकायदेशीर बांधकाम, चिंबेल जंक्शन येथे उड्डाणपुलाच्या बांधकामाला होणारा विलंब इत्यादी प्रश्न उपस्थित करत आपली भूमिका चोख बजावली. “मी खड्ड्यांनी भरलेल्या अटल सेतूवर ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो” अशा हजरजबाबी उत्तराने रुडोल्फ फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांचीही बोलती बंद केली असे अमरनाथ पणजीकर यांनी निदर्शनास आणून दिले.

आमचे सर्व अकरा आमदार राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानादरम्यान एकसंध राहिले आणि उपसभापती निवडीच्या वेळी हीच एकजूट सर्वांनी दाखवली. काँग्रेसच्या एकजुटीने भाजप परिवाराच्या ए आणि बी टीमचा पर्दाफाश केला. ज्या तथाकथीत भाजप विरोधी आमदारांनी भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला मतदान केले तेच आमदार उपसभापतींच्या निवडणुकीदरम्यान तटस्थ राहिले, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.

काँग्रेस पक्ष आमच्या शिवोलीच्या एकमेव महिला आमदार डिलायला लोबो, साळगावचे आमदार केदार नाईक, कुंभारजुवा आमदार राजेश फळदेसाई तसेच इतर ज्येष्ठ आमदारांच्या कामगिरीचे कौतुक करतो व त्यांनी घेतलेल्या लोकांच्या प्रश्नांबद्दल त्यांचे अभिनंदन करतो असे अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!