गोवा 

राज्यात आज कोरोनाचे ५८बळी

पणजी :
राज्यातील कोरोना कहर आटोक्यात येण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५८ रुग्ण दगावल्याची नोंद आरोग्य खात्याच्या मेडिकल बुलेटिनमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बळींची संख्या आता दीड हजाराच्या पार गेली आहे.गेल्या २४ तासांत नव्या ३ हजार ८६९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी २ हजार ९०५ रुग्ण हे घरीच विलगीकरणामध्ये आहेत. तर २९१ रुग्ण हे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेत. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे तब्बल २ हजार २३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. सध्याच्या घडीला राज्यात २९ हजार ७५२ इतके सक्रिय रुग्ण आहे. त्यामुळ शुक्रवारी सक्रिय रुग्णसंख्या ३० हजाराचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रुग्णसंख्या वाढत असली आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असली, तरीही मृत्यूदर काही आटोक्यात येत असल्याची चिन्ह दिसत नाहीएत. कारण गेल्या २४ तासांत ५८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोना बळींचा आकडा हा आता १ हजार ५०१वर पोहोचलाय.
जीएमसीत 35, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात 18 आणि उत्तर गोवो जिल्हा इस्पितळात 2 तर अन्यत्र 3 असे एकूण ५८ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: