गोवा 

‘लसीकरणासाठी जनतेने घ्यावा पुढाकार’

पणजी :
कोरोनाविरोधातील लढाई अधिक सक्षम करण्यासाठी आता जनतेने सहकार्य करावे आणि घराबाहेर पडून लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा असे आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. वन खात्याने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्य सरकारने यावर्षी 30 जुलैपर्यंत 18-44 वयोगटातील प्रत्येकाचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे, असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले. राज्यातील ​लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्वांनी स्वत:चं लसीकरण करून घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. राज्याने 30 जुलै 2021 पर्यंत राज्यातील 18 ते 44 वयोगटातील प्रत्येकाचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. 18 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या लोकांसाठी शंभर टक्के लसीकरण करणारं गोवा हे देशातील पहिले राज्य असावं अशी माझी इच्छा आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्यासाठी राज्याने मुलांचे पालक, दिव्यांग, दर्यावर्दी, मोटारसायकल टॅक्सी, आणि रिक्षा चालक यांना सध्या प्राधान्य दिलं आहे. 2 वर्षांहून कमी वयाच्या मुलांचे पालक तसंच को-मॉर्बिटी रुग्णांसाठी आम्ही गुरुवारी लसीकरण सुरू केलं आहे. मी आढावा घेतला होता तेव्हा मला आढळले की या श्रेणीतील केवळ 1,300 लोकांनी स्वत:चं लसीकरण करून घेतलंय. राज्य सरकारने आता लसीकरणाची व्याप्ती वाढवताना पाच वर्षांपर्यंतच्या मुलांच्या पालकांचा या गटात समावेश करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.​​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: