गोवा 

गोवा भयंकराच्या दरवाजात…

एकाच दिवसात तब्बल ५४ कोरोना बळी

पणजी:
राज्यात कोविडची (goa covid) दुसरी लाट खूपच प्रखर बनली आहे. कोविड बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच राज्यात आज आजवरचे सर्वाधिक म्हणजे एकूण ५४ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याने गोवा भयंकराच्या दरवाजात उभे असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.  त्याचवेळी राज्य सरकारच्यावतीने सदर आकडा सुरुवातीला ५४ आणि नंतर तो ४० असा करून पुन्हा काही वेळाने ५४  केल्याने गोंधळाचे वातावरण झाले होते.
यापूर्वी कोविडयुळे चोवीस तासांत २८ बळी गेले होते. पण गेल्या २४ तासांमध्ये ५४ मृत्यू झाल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणादेखील हतबल झाल्याचे दिसत आहे. या ५४ पैकी ३८ मृत्यू गोमेकॉ तर १२ मृत्यू दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, दोन मृत्यू उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात, एक मडकई आरोग्य केंद्रात, एक उत्तर गोव्यातील एका खाजगी रुग्णालयात झाला आहे.राज्यात गेल्या २४ तासांमध्ये २३०३ नवे कोविड रुग्ण सापडले आहेत.
goa covidदरम्यान, राज्यात लॉकडाऊन पंधरा दिवसांनी वाढवला जावा अशी मागणी ‘मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर, काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड आणि भाजपचे मंत्री मायकल लोबो यांनी केली आहे.

दिगंबर कामत यांची सरकारवर टीका
त्याचवेळी राज्यसरकारकडून कोविड बाधितांच्या मृत्यूच्या संख्येमध्ये घोळ घातला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केला आहे. कामत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य सरकारवर ताशेरे ओढले असून, ‘सरकारने कोविड मृतांची आकडेवारी ५४ असल्याचे सांगुन काही मिनीटांनंतर सदर संख्या ४० असल्याचा खुलासा केला. या एकंदर प्रकारातुन असंवेदनशील भाजप सरकारचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. सरकारने १४ मृतांची संख्या काल लपवण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट होते. सरकारने असे का केले व यापुर्वी किती वेळा केले याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देणे गरजेचे आहे. सरकार एकिकडे लोकांना जगायला देत नाही तर दुसरीकडे मृतांच्या बाबतीतही  खेळ मांडते. जे काय चालले आहे ते माणुसकीच्या पलीकडे आहे.’ अशा शब्दात दिगंबर कामत यांनी सरकारवर टीका केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: