गोवा 

‘कोविड व्यवस्थापन कृतीदलाकडे सोपवा’

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत  यांनी केली मागणी 

मडगाव :
कोविड संकटाने अक्राळ विक्राळ रुप धारण केले आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत असतानाच बळींचा आकडा मोठा होत चालला आहे. लोकांचा विश्वास उडत असुन, भाजप सरकारकडे जनतेला दिलासा देण्यासारखी कसलीच उपाय योजना नाही. आता लॉकडाऊन हाच एकमेव पर्याय समोर असून, सरकारने कडक अमंलबजावणी करुन तो लागू करावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सरकारने कोविड व्यवस्थापनाची धूरा समाजातील विवीध क्षेत्रातील तज्ञ व लष्कराचे कृतीदल स्थापन करुन त्यांच्याकडे सोपवावी या मागणीचा मी पुर्नउच्चार करतो.  झाले ते बस्स झाले, लोकांच्या जीवाशी अधिक खेळ नको असे दिगंबर कामत यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने मागील एक वर्षात वैद्यकिय सुविधा व सेवा वाढविण्यावर भर न देता केवळ उत्सव साजरे केले. आता या सरकारवर विसंबुन राहणे धोक्याचे आहे. सरकारने त्वरित कृतीदलाची स्थापना करावी व सर्व सुत्रे त्यांच्या हवाली करावीत अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली .कोविडच्या संकटकाळात पुढील एका महिन्यात मान्सुनचे आगमन होणार आहे. खंडित होणारी वीज, पुराचे संकट, वादळी वारे, रस्ते बंद होणे अशा संकटांमुळे कोविड व्यवस्थापनांवर गंभिर परिणाम होणार आहे. सरकारने आताच पावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीवर उपाय योजना काढण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचे आहे.
जुलै महिन्याच्या १५ तारखेपर्यंत सर्व गोमंतकीयांना कोविड लसीचा पहिला डोस देण्याची तयारी सरकारने केल्यास परिस्थिती नियंत्रणात येवू शकते. कृतीदलाला आर्थिक अधिकार देत, जनतेच्या हिताचे तातडीचे निर्णय घेण्याची अनुमती देणे गरजेचे आहे.
सरकारने अजुनही दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे दोन मजले कोविड रुग्णांसाठी पुर्णपणे उपयोगात आणलेले नाहीत. सरकार इस्पितळातील जागा सोडुन, शेजारील शाळेचे कोविड केंद्रात रुपांतर करु पाहते हे धक्कादायक आहे. आज जवळजवळ बंद असलेली काही इस्पितळे ताब्यात घेवुन सरकार तेथे रुग्णांची का सोय करीत नाही या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी देणे गरजेचे आहे.
सरकारने १०० कोटीची आर्थिक पॅकेज सामान्य व्यावसायिकांसाठी जाहिर करावी तसेच पारंपारीक व्यावसायींकासाठी गोंयचे दायज योजना त्वरित चालीस लावावी जेणेकरुन लॉकडाऊनचा आर्थिक प्रभाव कमी होण्यास या घटकांना मदत होईल. सरकारने यापुर्वी मी केलेल्या सुचनांकडे मागील एक वर्ष लक्ष दिले नाही. आता तरी लोकहितासाठी भाजप सरकार माझ्या सुचना मान्य करेल अशी आशा मी बाळगतो असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
goa covidसरकारने माझ्या सुचनांचा गांभीर्याने विचार करावा. केंद्र व राज्यातील भाजप सरकारने मागील एका वर्षात कृतीदल स्थापन करण्यावर भर दिला नाही. आता सरकारला जाग आली असुन, केंद्र सरकारने लष्कराकडे कोविड संकटाचा सामना करण्यावर चर्चा सुरू केली आहे हे स्वागतार्ह आहे असे दिगंबर कामत म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांनी केलेल्या घोषणांची अमंलबजावणी होते याची खातरजमा करुन घेणे गरजेचे आहे. परवा डिडीएसएसवाय योजनेखाली कोविडचे खासगी इस्पितळात उपचार होणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. परंतु, खासगी इस्पितळांकडे त्यासबंधी आदेश पोचलाच नसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना कष्ट व मनस्ताप सहन करावा लागत आहे असे दिगंबर कामत यांनी लक्षात आणुन दिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: