गोवा 

फेब्रुवारीमध्ये होणार विधानसभा निवडणूक

पणजी :
गोव्यातील  विधानसभा निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात येतील. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजपचे राष्ट्रीय सरचीटणीस बी.एल.संतोष यांनी दोन दिवसांपूर्वी गोव्यात भेट देत, राज्यमंत्री, पदाधिकारी, भाजपाचे आमदार आणि भाजपच्या कोअर कमिटीच्या सदस्यांसोबत बैठका घेतल्या. त्यानंतर दोन दिवसांतच गोव्याचे मुख्यमंत्र्यांनी निवडणुकांबाबत सांगितले आहे.

संतोष आणि सी.टी.टी रवी यांच्याशी झालेल्या भेटीबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, या भेटीत गोव्याच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. निवडणुकीस आता फक्त ६ महिने बाकी आहेत. आम्ही निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. आमचा पक्ष एक संघटना म्हणून काम करीत आहे.

दरम्यान, काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव हे १ जून पासून गोव्याच्या ४ दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यात ते, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील. तसेच विविध पक्षीय गटांशी देखील चर्चा करतील. अशी माहिती गोवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: