गोवा 

‘या’ गावात उभारणार ३०० कोटींची मनोरंजन सिटी

​​पेडणे ​(​निवृत्ती शिरोडकर​) :

पर्यटन व्यवसायाला चालना व प्रोत्साहन देण्यासाठी आता निसर्गसंपन्न मांद्रे पंचायत क्षेत्रात , जुनासवाडा मांद्रे येथील सरकारी १लाख ६४ हजार चौरस मीटर जागेपैकी १लाख पन्नास हजार चौरस जमनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुउ​द्देशीय  इंटरटेटमेंट व्हिलेज मनोरंजन प्रकल्प ३०० कोटी खर्च करून उभारला जाईल त्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली आहे . तीन महिन्याच्या आत महसूल विभागाकडे असलेली जागा पर्यटन खात्यामार्फत नंतर ती गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्या ताब्यात दिली जाणार आहे .

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात महत्वाची बैठक झाली त्यात उपमुख्यमंत्री तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर , मांद्रेचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चे​अर​​न दयानंद सोपटे , संबधित खात्याचे अधिकारी , पेडणेचे उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर उपस्थित होते .

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी अधिकाऱ्यांना जागा लवकर प्रक्रिया करून जमीन हस्तातरीत करण्याचा आदेश दिला​. 

जुनासवाडा वनखात्याच्या गार्डन च्या वरच्या बाजूला सरकारची एक लाख ६४ चौरस मीटर जागा आहे​. ​एक लाख ६४ हजार जागेपैकी १४ हजार जागा सार्वजनिक बांधकाम विभाग व त्यात एक उपविज केंद्र उभारले जाईल , व उर्वरित १ लाख ५० हजार जागेत मनोरंजनात्मक प्रकल्प उभारण्यात येणार आहे .

​​एका छताखाली सर्व सोयी​ :​
या प्रकल्पात भव्य ​​सभा​गृह, मिनी स्टुडीओ , तारांकित हॉटेल ,५०० लोकाना एकत्रित बसून बैठका, कॉन्फारंन्स सभा​गृह, निवासी व्यवस्था , पार्किंग , चेंजिंग रूम , शौचालय शिवाय पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात मनोरंजन करणारे मुव्झिक इवेंट साठी कायमस्वरूपी जागा  उपलब्ध असणार , शिवाय बाहेर देशातील उद्योगपती विविध क्षेत्रातील नागरिक व्यावसायिक यांच्यासाठी एकाच छताखाली सर्व सोयी सुविधा युक्त जागा त्यात राहण्याची , खाण्यापिण्याची सोय व एकाच कॉन्फरन्स हॉल मध्ये एकाच वेळी ५०० नागरिकाना बसण्याची सोय असणार .

मांद्रे मतदार संघातील आणि पर्यायाने तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प हा मांद्रे पंचायत क्षेत्रात उभारला जाणार आहे . त्यामुळे मांद्रे पंचायतीला वर्षाकाठी करोडो रुपये महसूल मिळणार आहे . त्यामुळे मांद्रे पंचायत भविष्यात श्रीमंत पंचायत ठरणार आहे .

​​कलाभवनाचा प्रस्ताव या जागेत होता
या जागेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात असलेले  माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून या भागाचे आमदार रमाकांत खलप होते , त्यांनी या जागेत सायबरसिटी उभारण्याची घोषणा केली होती , मात्र त्याला विरोध झाला , त्यानंतर त्यांच्या जागेवर आलेले आमदार प्रा. लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी कला भवन उभारण्याचे आमदार झाल्यानंतर प्रथमच स्थानिक पत्रकारोसोबत वार्तालाप करताना सांगितले होते . मात्र त्याठिकाणी कला भावांचा मुहूर्त कुणालाच आजपर्यंत गवसला नाही .

​​आमदार काय म्हणतात ?
मांद्रे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व आमदार दयानंद सोपटे करत आहेत  आणि आता त्यांच्याकडे गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन पद आहे .आणि त्यांच्या महामंडळा कडून मांद्रे येथे सर्वात उत्कृष्ट दर्जाचा मनोरंजन सिटी निर्माण होत आहे , त्या विषयी त्याना विचारले असता ,सरकारच्या जागेत हा प्रकल्प होत आहे , तीन महिन्याच्या आत जागा हस्तातरीत करून महामंडळाकडे मिळेल त्यानंतर प्रकल्पाला सुरुवात होणार आहे . बहुउदेषीय असा प्रकल्प असणार आणि , त्यात सर्व सोयी सुविधा उपलब्ध असणार आहे , स्टुडीओ असेल तारांकित हॉटेल , निवाशी व्यवस्था , पार्किंग व्यवस्था  , आणि या प्रकल्पाचे आमदार या नात्याने आपण स्वागत करतो , शिवाय पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध केली जाणार असे ते म्हणाले .

​​goa bjpपर्यटनमंत्री काय म्हणतात ?
पर्यटन मंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे संपर्क साधला असता पेडणे तालुक्यात मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ होतो , देश विदेशातील अनेक पर्यटक या विमानतळावर येणार आहे , काही पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येणार तर काहीजण मनोरंजनाची साधने शोधण्यासाठी येणार आहे , आणि मोपा विमानतळापासून जवळच मांद्रे येथे बहुउदेषीय मनोरंजन ग्राम प्रकल्प एका छताखाली उभारला जाणार आहे , आणि त्या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगून या प्रकल्पातून हजारो रोजगार नोकऱ्या उपलब्ध होणार आहे . या प्रकल्पामुळे पेडणे तालुक्याची जागतिक पातळीवर ओळख होईल असा दावा केला .

मनोरंजन ग्राम या प्रकल्पाची गोवा मुक्तीदि​नी, १९ डिसेंबर रोजी भूमिपूजन करण्यात येईल .

​​ व्यावसायिक नागरिक स्थानिक याना काय वाटते ?
मांद्रे येथील रीवा रिसोर्ट चे व्यवस्थापक सुरज यांनी प्रतिक्रिया देताना जर मांद्रेत मनोरंजनात्मक ग्राम प्रकल्प उभारला तर पर्यटनाला वाव मिळवून दिला जाणार आहे , परिसरातील हॉटेल व्यावसायीकाना त्यांचा लाभ होईल , मनोरंजनाची साधने उपलब्ध झाली तर त्या ठिकाणी पर्यटक स्थिरावू शकतो असे मत व्यक्त केले .

मांद्रे सरपंच सुभाष आसोलकर याना विचारले असता मांद्रेत जर कोणताही चांगला  प्रकल्प येत असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू ,मांद्रेत मनोरंजन ग्राम सिटी होते याची कल्पना पंचायतीला नाही , हि माहिती पत्रकाराकडून मिळते , कोणता प्रकल्प येणार त्याची माहिती मिळवणार व नंतर सर्व पंचायत मंडळाला विश्वासात घेवून पंचायतीची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सरपंच सुभाष आसोलकर यांनी सांगितले .

गोवा पर्यटन विकास महामंडळ संचालक सुदेश सावंत यांनी प्रतिक्रिया देताना मागच्या तीन महिन्यापासून आपण स्वता या प्रकल्पाच्या मागे आहे , जागेविषयी सोपस्कार झाल्यानंतर प्रक्रिया सुरु होणार , या प्रकल्पाचा लाभ पर्यटका बरोबरच स्थानिकाना होणार आहे , किनारी भागात नियोजन नसताना पर्यटन हंगामात ज्या संगीत रजनीतून ध्वनीप्रदूषण होते, पार्किंग समस्या , स्थानिकाना त्रास होतो , त्या आयोजकाना या ठिकाणी प्रशस्त साउंडप्रुफ जागा उपलब्ध असणार शिवाय ध्वनी संकल्पना असणार , तारांकित हॉटेल , चेन्गिंग , ग्रीन रूम पार्किंग सर्व प्रकारच्या सोयी सुविधा युक्त प्रकल्पाचे आम्ही स्वागत करतो असे सुदेश सावंत म्हणाले .

मांद्रे मगोचे नेते जीत आरोलकर यांनी प्रतिक्रिया देताना मनोरंजन ग्राम म्हणजे नक्की काय याची पूर्ण माहिती पंचायतीला द्यायला हवा , जी जागा निवडलेली आहे त्या ठिकाणी दरवर्षी युवक झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करत असत , या प्रकल्पात हरित वातावरण असेल कि कॉंक्रीट असेल त्याची माहिती जनतेला मिळायला हवी , डिसेंबरमध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यात विधानसभेची निवडणुका होणार , याचा अर्थ काय एखाध्याला टार्गेट करून प्रकल्प आणणाऱ्यानी साडेचार वर्षात का आणला नाही असा प्रश्न उपस्थित करून मतदार संघातील सर्व नागरिकाना , पंचायत मंडळाला विश्वासात घेवून प्रकल्पाची अगोदर सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी जीत आरोलकर यांनी केली .

माजी सरपंच राघोबा गावडे यांनी प्रतिक्रिया देताना कोणताही प्रकल्प आणण्यापूर्वी स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे ,हा प्रकल्प म्हणजे नक्की कोणता त्याची माहिती जनतेला द्या अशी मागणी केली​. 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: