गोवा 

‘कोरोना लसीकरण हा काही उत्सव नाही’

मडगाव :
केंद्र व राज्यातील भाजप सरकारने लाखों नागरिकांना संपविण्याचे काम केले असून हे सरकार फक्त राजकारण खेळण्याचे काम करीत आहे. सरकारने लसीकरण केंद्राच्या बाहेर सेल्फी पॉईंट  तयार केला आहे. सेल्फी काढण्यासाठी हे लग्न किंवा उत्सव नसून कोरोनामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडल्याचे लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केले.

सरकार टीका उत्सवाच्या नावाखाली नागरिकांना लसी देत आहेत, मात्र लसीकरण हा कुठल्याही प्रकारचा उत्सव नाही, याची सरकारने जाणीव ठेवावी अशी टीका विजय सरदेसाई यांनी केली.फातोर्डा मतदारसंघात आजपासून मान्सून पूर्व कामांना सुरूवात करण्यात आली असून यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार सरदेसाई यांनी सदर टीका केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: