गोवा 

‘… तर भाजपच्यावतीने निवडणूक लढवू शकतो’

पणजी (विशेष प्रतिनिधी) :
भाजपने जर पक्षचिन्हावर निवडणूक लढवण्याची संधी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक आपण भाजपच्यावतीने लढण्याचा विचार करू शकतो, असे विधान प्रियोळ मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे कला, सांस्कृतिक आणि सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी आज केले.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष यांची पणजीत भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. गोविंद गावडे यांनी यावेळी सांगितले कि, आज मला बी.एल. संतोष आणि सी.टी. रवी यांनी बैठकीसाठी बोलवले होते. मला काही समस्या वा तक्रारी असल्यास त्या विचारण्यात आल्या. आणि यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने माझ्या चारही खात्यातील कामगिरीचा आढावा घेतला. तो मी त्यांना दिला. भाजप सरकारमध्ये मी मंत्री आहे. आणि आजवर मला सरकारने नेहमीच सकारात्मक पाठिंबा प्रत्येकवेळी दिला आहे. आणि मी देखील भाजपसोबत मनापासून काम करत आहे. आणि भाजपने जर मला आगामी निवडणुकीत पक्षाच्यावतीने निवडणूक लढवण्यास सांगितले तर मी त्यावर नक्कीच विचार करेन. पण असे असले तरी आजच्या घडीला तरी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा माझा कोणताही विचार नाही.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटना) बी एल संतोष आणि सरचिटणीस गोवा डेस्क प्रभारी सी टी रवी हे 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या दोन दिवसीय भेटीदरम्यान ते आलितनो येथील शासकीय सर्किट हाऊस मध्ये पक्षाचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कोअर कमिटी सदस्यांची भेट घेत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: