गोवा 

”हे’ सरकार म्हणजे कचरा यार्ड’

मलनिस्सारण मुद्द्यावरून ​काँग्रेसने दिली तिखट प्रतिक्रिया

पणजी :
गोव्यातील भाजप सरकार म्हणजे दुर्गंधीयुक्त कचरा यार्ड बनले आहे. उच्च न्यायालयाकडुन या सरकारला वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने चपराक बसत असून, बेजबाबदार व अकार्यक्षम डॉ. प्रमोद सावंत यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजिनामा देणे गरजेचे आहे अशी मागणी कॉंग्रेसचे प्रवक्ते ॲड. श्रीनिवास खलप यांनी केली आहे.

काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सिव्हरेज महामंडळाकडुन पणजीत उघड्यावर सोडण्यात आलेल्या घाणीबद्दल सरकारची चांगलीच कान उघाडणी केली होती त्यावर प्रतिक्रिया देताना कॉंग्रेस प्रवक्त्याने वरिल मागणी केली आहे.

आपल्या आदेशात, सदर घाण उघड्यावर सोडण्याचे बंद करण्याचे सोडुन, भाजप सरकारने २०१२ ते २०२१ पर्यंत सदर प्रकार उघडकीस आणणाऱ्या तक्रारदाराविरूद्ध कारवाईचा ससेमीरा लावला त्यावर भाजप सरकारला “तुमच्याकडे आणखी काम नाही का?” असा प्रश्न विचारुन उच्च न्यायालयाने भ्रष्ट भाजप सरकारचे कान पिळले असा टोला ॲड. श्रीनिवास खलप यांनी हाणला आहे.

सरकारला आपल्या गलथान कारभाराविरूद्ध बोलणाऱ्यांआड गुन्हे दाखल करण्याची सवय झाली आहे का? असा प्रश्न विचारुन, जनहिताच्या नजरेने तक्रार दाखल करुन न्याय मागणाऱ्यांना सरकारने मदत करणे गरजेचे आहे असे सांगून उच्च न्यायालयाने भाजप सरकारला भानावर येण्याचा सल्ला दिला आहे.

एका स्टाफ नर्सच्या मागे दक्षता विभागाच्या चौकशीचा ससेमीरा लावण्याऐवजी सरकारने लोकहितासाठी सदर घाण वाहणे बंद करणे महत्वाचे होते हे सरकारला सुनावले हे बरे झाले, असे ॲड. श्रीनिवास खलप यांनी म्हटले आहे.

उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणातून भाजप सरकारचे सुडाचे राजकारण परत एकदा समोर आले असुन, सरकारच्या नाकर्तेपणाच्या विरूद्ध बोलणाऱ्यांची बोलती बंद करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग  भाजप सरकार करीत असल्याचे परत एकदा उघड झाले आहे असा दावा ॲड. श्रीनिवास खलप यांनी केला आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: