गोवा 

खासगी रुग्णालयातील बेड्सवर आता सरकारचा अधिकार

पणजी :
राज्यात कोविडवर उपचार देणाऱ्या २१ खासगी रुग्णालयांतील सर्व बेड्सचा ताबा सरकारने आपल्याकडे घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत हि महत्वपूर्ण घोषणा केली. सोमवार, १७ मे पासून या घोषणेवर कार्यवाही करण्यात येणार आहे. उशिरा का असेना पण रुग्णांना दिलासा देणारी हि घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे नागरिकांनी आभार मानले आहेत.

कोविडवर उपचार देणाऱ्या २१ खासगी रुग्णालयांतील ५० टक्के बेड्स सरकारनं कोविडसाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते. पण सातत्याने आवाहन करुनही अनेक तक्रारी खासगी रुग्णालयांबाबत ऐकू येत होत्या. अखेर या तक्रारींवर रामबाण उपाय म्हणून आता सरकार खासगी रुग्णालयांतील सर्व बेड्स आपल्या ताब्यात घेणार असल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. येत्या सोमवारपासून हा निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून रविवारी हा आदेश जारी केला जाणार आहे. यानुसार एक सरकारी अधिकारी प्रत्येक खासगी रुग्णालयांत नेमण्यात येणार असून, अधिकारी रुग्णांना दाखल करुन घेण्याची जबाबदारी पार पाडतील.  तर कामाचे नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी संबधीत रुग्णालयाचीच असणार आहे.

pramod sawant
डॉ. प्रमोद सावंत

दरम्यान, डीडीएसएसव्हायचे लाभार्थी असणाऱ्यांचे संपूर्ण  बिल हे सरकार खासगी रुग्णालयांना देईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले. वाढत्या कोरोना संसर्गामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेवर ताण आलेला आहे. मोठ्या संख्येने रुग्ण आता उपचारासाठी रुग्णालयात धाव घेत आहेत. मात्र अनेक खासगी रुग्णालयांमध्ये डीडीएसएसव्हायमुळे उपचार नाकारले जात आहेत, किंवा बेड्स दिले जात नसल्याच्या तक्रारी समोर आल्याचे मान्य करत अखेर खासगी रुग्णालयांतील १०० टक्के बेड्स सरकार ताब्यात घेत असल्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: