गोवा 

गोव्यात ९ मे पासून १५ दिवस ‘लॉकडाऊन’

पणजी :
कोरोनाची दुसरी लाट धोकादायक असल्याचं नमूद करत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवार 9 मे पासून 15 दिवसांचा राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला. रविवार दि. 23 मे पर्यंत हा कर्फ्यू असेल. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू असतील, असे सांगतानाच लोकांनी स्वतःहून गरजेशिवाय घराबाहेर पडण्याचं टाळावं,असं आवाहन त्यांनी केलंय. लॉकडाऊन समजा किंवा कर्फ्यू पण लोकांनी स्वतःची काळजी घेण्याची ही वेळ आहे,असे म्हणत त्यांनी लॉकडाऊन हा शब्द पुन्हा एकदा टाळला आहे.
कोविडबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने भाजप आमदारांनीही मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाऊनची मागणी केली होती. शिवाय मृतांचा आकडाही वाढू लागल्याने सर्वच स्तरांतून कठोर निर्बंधांची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घोषित केला.
वेळेत उपचार घेणारे कोरोनामुक्त होतात, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन केलं. शुक्रवारी दिवसभरात 56 जणांचा मृत्यू झाल्यानं कोरोनाचं संकट आणखी गडद झाल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे गरज नसतानाही घराबाहेर पडणं धोकादायक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारनं कितीही निर्बंध घातले, तरी लोक त्याचं पालन करत नसल्यानं मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकांनी स्वत:हून नियमांचं पालन करावं, असं आवाहन त्यांनी केलं. रविवार दि. 9 मेपासून राज्यस्तरीय कर्फ्यू जारी होईल. रविवार 23 मे पर्यंत कर्फ्यू लागू असेल. यासंबंधी शनिवारी अधिकृत नियमावली जाहीर करण्यात येईल. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं खुली राहणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यासाठी गडबड, गर्दी करू नये, असं आवाहन त्यांनी केलं.
Goa lokdownया 15 दिवसांच्या कर्फ्यू काळात सर्व सार्वजनिक, धार्मिक सोहळे बंद करावेत, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. गोव्यात येणार्‍या पर्यटकांना निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या पूर्ण पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊन हा शब्द वापरला नाही. मात्र त्यांनी कर्फ्यू लावल्यानं लॉकडाऊन लावल्याचाच संदेश लोकांपर्यंत गेला. लोकांनी बाजार खरेदीसाठी गर्दी करू नये. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रोज सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत खुली राहणार आहेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलंय
मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेच्या सुरूवातीपासूनच या परिस्थितीचा सगळा दोष सरकारवर नको,असे स्पष्ट केले. सरकारच्या उणीवा असतील पण लोकांनी बेजबाबदारपणे वागू नये,असेही ते म्हणाले. एकीकडे कोरोना चाचणी अहवाल कित्येक दिवस मिळत नाहीत,अशी तक्रार आहे पण मुख्यमंत्री म्हणतात की सगळे अहवाल 48 तासांत मिळतात,अशी माहिती आपल्याला आहे. कोरोनाचे कडक निर्बंध असूनही लोक विनाकारण घराबाहेर पडतात. लोकांवर पोलिस कारवाई करावी लागते, याचा आपल्याला खेद वाटतो,असंही ते म्हणाले. राज्यव्यापी कर्फ्यूसंबंधी शनिवारी आदेश प्रसारित​ ​होईल,असेही त्यांनी म्हटलंय.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: