गोवा 

‘सरकारने मराठी राज्यभाषेसाठी अध्यादेश काढावा’

पणजी (निवृत्ती शिरोडकर) :
काश्मीरचे ३७० वे कलम रद्द करण्यासाठी देशात कुठेही आंदोलन झाले नाही , मोर्चे निघाले नाही , जनता रस्त्यावर आली नाही, किंवा कुणी हे कलम रद्द करावे म्हणून मागणी केली नाही , तरीही सरकारने अध्यादेश जारी करून कलम रद्द केले , त्याच पद्धतीने आता सरकारने गोमंतकाची राज्यभाषा करण्यासाठी खास अध्यादेश काढून मराठीला राजमुकुट चढवावा असे प्रतिपादन मराठी राज्यभाषा समितीचे जेष्ठ मराठीप्रेमी गो. रा, ढवळीकर यांनी क्रांतीदिनी आझाद मैदान पणजी येथे १८ रोजी केले .

मराठी प्रेमितर्फे क्रांतीदिनी सुरुवातीला हुतात्म्याना आदरांजली वाहिली , आणि मराठीसाठी आता नव्याने क्रांती करण्याचा निर्धार केला. यावेळी पणजीचे माजी महापौर अशोक नाईक , अनुराधा मोघे , यशवंत मळीक ,मच्छिंद्र च्यारी , प्रतिभा बोरकर , राजाराम जोग , विनोद पोकळे , दिवाकर शिक्रे , निवृत्ती शिरोडकर दत्ताराम ठाकूर आदी उपस्थित होते .

गोमंतकात परत एकदा नव्याने मराठी राज्यभाषा करण्यासा या पवित्रदिनी उपस्थितांनी निर्धार केला . गावागावात वाड्या वाड्यावर मराठीची चळवळ नेण्यासाठी व्यापक बैठका घेवून न्याय मिळेपर्यंत लढा देण्यावर एकमत झाले .

गो. रा. ढवळीकर यांनी पुढे बोलताना मराठी हि या मातीतली , या भूमीतली भाषा आहे ., ती परकी नाही , मात्र राजकर्त्यांनी मराठीचा वापर करून आपले राजकीय स्थान मजबूत केले . आता राजकर्त्यांनी आपली चूक मान्य करून सरकारी अध्यादेश काढून मराठी राज्यभाषा करून राजमुकुट चढवण्याची मागणी केली .

राज्यात एकूण १० मराठी वृतपत्रे चालतात , मराठी संस्कृती आजही अभाधित आहे , कीर्तन भजन , सांस्कृतिक कार्यक्रम दरदिवशी गावागावात मंदिरात , शाळेत होतात . आता सरकारने मराठीला उशिरा का होईना न्याय देण्यासाठी नवीन क्रांतीकारक निर्णय घेवून मराठी राज्यभाषा जाहीर करून खऱ्या अर्थाने  स्वातंत्रसैनिक हुतात्म्याना आदरांजली द्यावी असे मत व्यक्त केले. मराठीला न्याय मिळवून देण्यासाठी आता आम्हाला नव्याने क्रांती करावी लागेल , वेळप्रसंगी सरकारसोबत दोन हात करावे लागतील असे म्हटले .

नाट्य कलाकार दत्ताराम ठाकूर यांनी बोलताना मराठी हा आमचा स्वास आहे , तिला राज्यभाषेचा मान मिळायला हवा , त्यासाठी आम्ही परत जागृती करायला तयार आहोत , गावागावात परत बैठका , मराठी संस्कार  केंद्रे उभारून मराठीची सेवा करुया असे सांगितले .

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळावा
भूतपूर्व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर , माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मिकान्त पार्सेकर व विध्यमान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची वेळोवेळी मराठी प्रेमींनी भेट घेतली , त्या त्यावेली मराठीवर झालेला अन्याय दूर करणार अशे आश्वासन दिले , आमचे २१ आमदार भाजपाचे विधानसभेत निवडून आले तर मराठीला राज्यभाषेचा मुकुट चढवणार असे आश्वासन दिली होते , ते आजपर्यंत पाळणे नाही , आता मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी ऐतिहासिक निर्णय घेवून मराठीला मानाचे स्थान द्यावे , राज्यभाषा करून कायमचा हा विषय सोडवावा अशी यावेळी मराठी प्रेमींनी मागणी केली .

प्रतिभा बोरकर यांनी सूत्रसंचालन केले. अनूराधा मोघे यांनी आभार मानले, तर मच्छिंद्र च्यारी यांनी यांनी मराठीच्या चळवळीचा आढावा घेतला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: