गोवा 

भाजपासोबत युती नाहीच : सुदिन ढवळीकरपेडणे (निवृत्ती शिरोडकर)भाजपाने पाठीत खंजीर खुपसला, मगोचा हात धरून भाजपाने विधानसभेत प्रवेश केला. त्याच भाजपने वेळोवेळी मगो पक्षाचा अपमान केला त्या पक्षासोबत युती करण्याचा प्रश्नच नसल्याची ग्वाही मगोचे नेते आणि मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी मांद्रे येथे मगोच्या प्रमुख कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना मगोच्या कार्यालयात दिली.मगो पक्ष भाजपाकडे युती करणार अश्या आशयाच्या बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून आणि सामाजिक माध्यमातून प्रसारित झाल्या होत्या त्याविषयी मांद्रेचे मगोचे कार्यकर्त्ये सम्ब्राभात पडले होते. मगोने भाजपासोबत युती केली तर मान्द्रेची उमेदवारी मगोलाच जीत आरोलकर याना मिळेल कि नाही. याची विचारणा कार्यकर्त्ये जीत आरोलकर यांच्याकडे करत होते, मगोचे कार्यकर्त्ये संतप्त झाले होते. कार्यकर्त्याची दखल् घेवून जीत आरोलकर यांनी मगोचे नेते सुदिन ढवळीकर याना मंद्रेत आमंत्रित केले होते.


१५ रोजी मगोचे नेते सुदिन ढवळीकर उशिरा मान्द्रेत कार्यकर्त्यांकडे संवाद आणि त्यांची समजूत काढायला आले होते. त्यावेळी मगोचे मांद्रे उमेदवार जीत आरोलकर, पेडणे मगोचे उमेदवार प्रवीण आर्लेकर, अनंत नाईक, माजी सरपंच सुभाष आसोलकर, पंच प्रवीण वायगणकर , माजी सरपंच प्रदीप हडफडकर, पंच महादेव हरमलकर माजी सरपंच सेरेफिना फर्नांडीस पंच गुणाजी ठाकूर, राघोबा गावडे आदी उपस्थित होते. शिवाय विविध गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी ढवळीकर यांच्याकडे संवाद साधला.आगामी निवडणुकीत भाजपा सोबत मगो युती करणार नाही, परतू कॉंग्रेस पक्षाकडे युती संधर्बात प्राथमिक बोलणी चालू आहे, काही अटी मान्य झाल्यातर कॉंग्रेसकडे युती होवू शकते मात्र भाजपा सोबत युती कधीच नाही, या अफवावर मगो कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन सुदिन ढवळीकर यांनी आवाहन केले.
मगोच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या कामाला लागावे अशीही सुचना करायला ते विसरले नाही.

मांद्रे मगोचे नेते जीत आरोलकर यांनी बोलताना यंदा मांद्रे मधून केवळ मगो पक्षच पर्रीवर्तन घडवून आणू शकतो. आणि भाजपाला केवळ मगोच टक्कर देवू शकतो. त्यासाठी कोणत्याही स्थिती मगो पक्ष भाजपा सोबत युती करणार नाही. आणि इतर कोणत्याही पक्षाकडे युती झाली तर हि सीट मगो पक्षालाच उमेदवारी मिळेल आणि मगोचा आमदार विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला.

मांद्रे मगो गट अध्यक्ष प्रवीण वायंगणकर यांनी बोलताना कोणत्याही स्थितीत मगोने भाजपा सोबत युती करू नये त्या युतीला आमचाहि विरोध असेल असा इशारा दिला.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: