गोवा 

‘…अन्यथा बाबू आजगावकर आणि दयानंद सोपटे यांना घरी पाठवूया’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
गोमंतकियांच्या हातात असलेला एकमेव व्यवसाय टॅक्सी व्यवसाय आता सरकार हिसकावून घेऊन तो बिगर गोमंतकियांच्या हातात देऊ पाहत आहे. पर्यटनमंत्री बाबू आजगावकर विधानसभेत छाती ठोकून आपण गोवा माईल्स आणल्याचे जाहीरपणे सांगतात. आता त्यांनीच व पर्यटन विकास महामंडळ चेअरमन आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी तो ऍप रद्द करावा अन्यथा दोन्ही आमदाराना घरी बसवण्यासाठी तयारी करायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशारा टॅक्सी व्यावसायिकांनी दिला आहे.

 

पेडणे व बार्देश टेक्सी व्यावसायिकांनी ३० रोजी खिंड मोरजी येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती . त्यावेळी त्यांनी इशारा दिला यावेळी बाप्पा कोरगावकर ,योगेश गोवेकर , संजय कोले , प्रकाश  पुरखे बेबलो सिमायीस ,आदींनी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर व मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांच्यावर खरमरीत टीका केली .

१०० गुन्हे दाखवा ; बाप्पा कोरगावकर
टॅक्सी व्यावसायिक संघटनेचे पदाधिकारी बाप्पा कोरगावकर यांनी बोलताना टॅक्सी व्यावसायिक प्रामाणिक आहेत आणि प्रामाणिक काम करतात. मात्र पर्यटनमंत्री बाबू आजगावकर व्यावसायिकावर आरोप करतात, जर सरकारने व्यावसायिकांवर लेखी १०० गुन्हे नोंद केलेले दाखवावेत अन्यथा पर्यटनमंत्री किती प्रामाणिक आणि कसे कमिशन खातात यांच्या हिशोब जनतेला आहे. पेडणेकरांच्या मतावर ते निवडून आले तेच पेडणेकर त्याना परत मडगावला पाठवायला उशीर करणार नाही असा इशारा दिला .

क्रीडा खात्याचा काय लाभ ?
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्याकडे क्रीडा खाते आहे त्यांनी त्या खात्यांतर्गत युवकाना विविध क्रीडा प्रकारचे प्रशिक्षण देऊन खेळाडू तयार करायला हवे, पण आजगावकर ते करणार नाही. ते आता शामाप्रसाद स्टेडियम खाजगीरीत्या लीजवर देणार आहेत, ते केवळ कमिशन खाण्यासाठी असा दावा कोरगावकर यांनी केला. हॉटेल लीजवर देतात ते कमिशन खाण्यासाठी,  टॅक्सी व्यावसायिक चोर नाहीत, आरोप करताना सिद्ध करावे, केले तर तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकतो, असेही कोरगावकर यांनी सांगितले.

 
सरकार आणि टॅक्सी व्यावसायिक यांची आजपर्यंत एकदाही बैठक तोडगा काढण्यासाठी झाली नाही , सरकार फटिंगपणाचा कळस गाठत आहे. आता चर्चा नाही, हि वेळ आहे कृती करण्याची आणि  टॅक्सी व्यावसायिक आता पेडणेतील दोन्ही आमदाराना कृतीतून शिकवणार असे सांगितले.  टॅक्सी व्यावसायिक संघटीत होऊन दोन्ही आमदाराना घरी पाठवून आमचे आमदार आणि सरकार निवडून आणणार असे सांगितले.

मोरजीचे व्यावसायिक प्रकाश पुर्खे यांनी बोलताना पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे विधानसभेत चक्क खोटे बोलून  टॅक्सी व्यावसायिकांकडे बैठक झाल्याचे सांगतात, त्याला प्रति आव्हान देताना त्यांना विचारा तेच सांगतात  कि गोवा माईल्स हि मागच्या दाराने आली. त्याचेच मंत्री व आमदार म्हणतात मग आमची बैठक त्यांनी कधी घेतली?  दीड वर्षे गोवा माईल्स बेकायदा चालली.  २०१८ गोवा माईल्सचे टेंडर घातले तर मग त्यापूर्वी आमची बैठक कधी घेतले ते जाहीर करावे असे आवाहन केले ,त्यांनी समोरासमोर आमच्यासोबत बसावे असे आवाहन केले . या माईल्स एप मध्ये किती बिगरगोमंतकीय आहेत याची माहिती सरकारला नाही.

योगेश गोवेकर यांनी सांगितले सरकार हिटलरशाही, हुकुमशाही पद्धतीने वागत आहे. आता त्याचे फक्त सहा महिने राहिले आहेत. किनारी भागातील भाजपचा एक तरी आमदार निवडून येतो तर ते आम्ही पाहणार आम्हाला अटक करायची तर करू दे , पौर्तुगीज गेले आणि हिटलरचे भाजपा सरकार आले असा दावा गोवेकर यांनी केला .

बेब्लो सिमोयीस यांनी बोलताना उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याना आता लोकच धडा शिकवतील . चर्चिल आलेमाव विधानसभेत क्रीडा मंत्री बाबू आजगावकर याना विचारतात कि आपल्याला क्रीडा खात्यातून निधी का दिला नाही , त्यानाही  टॅक्सी व्यावसायिकांचे पडलेले नाही.

संजय कोले यांनी बोलताना मीटर बसवण्याची भाषा सरकार करते, तर मग जी गोव्यात हॉटेल आहेत त्या सर्वाचे खोल्यांचे दर एकाच असतील याची खबरदारी घ्यावी. विमानाची तिकिटे एकाच दराने द्या असे आवाहन करून कमिशन खाण्याचे बंद करा अशी मागणी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: