गोवा 

‘गरजवंताना आधार देणे हीच खरी सेवा’

पेडणे (निवृत्ती शिरोडकर) :
भाजपा सरकार प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे . प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी , गरजवंताना मदत करणे माझे कर्त्यव्य आहे असे उद्गार आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळ चेरमेन दयानंद सोपटे यांनी केले . मोरजी येथील वयोवृद्ध प्रेमावती मयेकर व सोनाबाई बांदेकर या दोन महिलासाठी व्हीलचेअर  मोफत प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या वेळी उत्तर गोवा भाजपा उपाध्यक्ष एकता चोडणकर , दीपश्री सोपटे आदी उपस्थित होते .

आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना आईसमान महिलाना आधार देण्याचे पुण्य काम आपल्या हातातून घडत आहे , हि ईश्वराची सेवा आपली आई आपल्या हातून करून घेत आहे . मांद्रे मतदार संघातील मतदारांनी आपल्याला दोन वेळा आमदार बनवले , त्याच्या आता समस्या सोडवणे , त्याचे वैयक्तिक आंणी सार्वजनिक  प्रश्न सोडवणे आपले कर्तव्य असल्याचे मत व्यक्त केले .

महिला भाजपा उपाध्यक्ष एकता चोडणकर यांनी बोलताना भाजपा सरकार हे सर्व सामान्य नागरिकांचे सरकार शिवाय आमदार दयानंद सोपटे हे सध्या कार्यरत आहे त्यातून त्यांची लोकप्रियता वाढत आहे .गरजूना  मदत करून त्यांनी त्या आईसमान महिलाना आधार दिल्याचे सांगितले.

sopate

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: