गोवा 

‘राज्याचा ऑक्सिजनचा प्रश्न लवकरच सोडवू’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली ग्वाही 

पणजी :
​राज्यात ​काही प्रमाणात ऑक्सिजनच्या पुरवठ्याचा प्रश्न असला तरी तो लवकरच सोडवला जाईल, ऑक्सिजनचा मुबलक साठा राज्यात असला तरी रुग्णांपर्यत तो पोहोचवण्यात काही अडचणी येत आहे. त्यावर काम केले जात असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बांबोळीतील जीएमसी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जीएमसीतील कोविड वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची पाहणी केली. त्याचप्रमाणे त्यांनी रुग्णांसोबतच कोविड वॉर्डमधील नर्स, डॉक्टर यांच्याशीही संवाद साधला. यानंतर ते पत्रकारांसोबत बोलताना हि माहिती दिली.
कोविड वॉर्डमधील समस्या काय आहे, तिथली परिस्थिती काय आहे, याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. प्रत्येक रुग्णाला चांगले उपचार मिळतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी रुग्णांना दिली. ऑक्सिजन सिलिंडर वॉर्डपर्यंत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. बहुतेक मी पहिलाच असा मुख्यमंत्री असेल जो कोविड वॉर्डात जाऊन थेट रुग्णांची भेट घेऊन आलो आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य समजून घ्यावं, अशा प्रत्यक्षपणे इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. त्याचप्रमाणे जी रुग्णालयं डीडीएसएसव्हायची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले असून, या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल असा विश्वास त्यांनी दिला.
ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत जे सेवा पुरवत आहेत, त्यांचीही जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यांनी यावेळेला ​​गरज समजून नव्या तंत्रज्ञानाप्रमाणे सेवा पुरवण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी हात वरुन जबाबदारी झटकणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, ​असेही त्यांनी बोलताना नमूद ​केले.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: