google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

सकारात्मक ऊर्जा-उत्साही वातावरणात पर्पल फेस्टला प्रारंभ

पणजी :

भारतातील पहिलावहिला वैविध्यतेचा तसेच सर्वसमावेशकतेचा सोहळा म्हणून उत्सुकता ताणलेला पर्पल फेस्ट २०२३ या महोत्सवाला आज पणजी-गोवा येथील गोवा मनोरंजन संस्थेच्या आवारत दिमाखदार प्रारंभ झाला.

आयनॉक्स कोर्डयार्डवर झालेल्या उद्घाटन सोहळ्यास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच कार्यक्रमाध्यक्ष म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांची प्रमुख उपस्थिती राहिली. तसेच राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, समाजकल्याण खात्याचे सचिव सुभाष चंद्रा, पणजीचे नगराध्यक्ष रोहित मोन्सेरात, गोवा राज्य विकलांग व्यक्तींसाठीचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, राज्य समाजकल्याण संचालिका संध्या कामत आदी मान्यवरांची उपस्थिती होती.


उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “गोवा राज्यामध्ये विकलांग व्यक्तींना सर्वाधिक पेन्शन दिली जाते. ८० टक्के विकलांगता असलेल्या व्यक्तीला मासिक ₹ ३५०० आणि इतर विकलांग व्यक्तीस मासिक ₹ २५०० रुपये दिले जातात. तसेच इतर राज्यांच्या तुलनेत गोवा राज्यामध्ये विकलांग व्यक्तींसाठीही आरक्षणाचे प्रमाण अधिक आहे. आम्ही राजधानी पणजी शहरास विकलांगता-प्रिय शहर बनवले असून सार्वजनिक इमारतीसुद्धा विकलांगता-प्रिय इमारत म्हणून विकसित करण्याचे आमचे नियोजन आहे.”


“पर्पल फेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून गोवा सरकारने देशातील विकलांग व्यक्तींना एकत्र आणून सक्षमीकरणाचे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध केले आहे. कौशल्य प्रशिक्षण, शैक्षणिक सुविधांचा विकास या माध्यमातून सामाजिक सक्षमीकरणासाठी योग्य पावले केंद्रीय मंत्रालयाच्या माध्यमातून उचलली जात आहेत,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. विरेंद्र कुमारे यांनी याप्रसंगी केले.


पहिल्या दिवसातील विविध उपक्रमांबाबतची काही ठळक मुद्दे असे:
करममळी तळ्यावर सकाळी झालेल्या बर्ड वॉक उपक्रमात ६९ प्रतिनिधी सहभागी झाले. यामध्ये दृष्टिदोष असलेले ३२, अंशतः अंध असलेले १५ आणि श्रवणदोष असलेले २२ प्रतनिधी सहभागी झाले. यादरम्यान त्यांनी विविध प्रकारच्या पक्ष्यांचे निरिक्षण केले.
पर्पल रेन उपक्रमामध्ये दृष्टिदोष तसेच संज्ञानात्मक समस्या असलेला तसेच वुई आर वन चॅरिटेबल ट्रस्टचा संगीतकार रित्विक आर राजा आणि शंकर महादेवन यांचा जॉयफुल कॉयर या उपक्रमाने गोवा मनोरंजन सोसायटीच्या आवार सांगितिक ऊर्जेने भारावून टाकले.


वुई केअर चित्रपट महोत्सवास मंत्री सुभाष फळदेसाई, सचिव ताहा हाजिक आणि क्युरेटर सतीश कपूर यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. या तीन दिवसीय चित्रपट महोत्सवामध्ये ६०००हून अधिक गोमंतकीय विद्यार्थी सहभागी होणार असून विकलांगतेवर आधारित चित्रपट पाहून या समस्यांबाबत अधिक जागृत व संवदेनशील होण्याचा प्रयत्न करणार आहेत. पहिल्या दिवशी फीट इन दि सँड, इम्पॉसिबल, नॅशनल अँथम इन साइन लँग्वेज, टायनी स्टेप आदी चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.


पर्पल एक्स्पिरियन झोनमध्ये विकलांग व्यक्तींसाठीचे विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. यामध्ये विकलांगांसह सर्वच लोकांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये फनडूक, फायदा, हेमोफिलिया सोसायटी गोवा, सेतू, समाज कल्याण कक्ष, आरोग्य कक्ष आणि जागृती मेळा असे विविध कक्ष आहेत. विविध संकल्पनाबाबत अधिक स्पष्ट आकलन घडवून आणण्याच्या उद्देशाने विविध कृती-उपक्रम राबवले जात आहेत.


पर्पल कॅलिडोस्कोप या कलादालनामध्ये तीन विभाग तयार करण्यात आले आहेत. यामध्ये दृष्टिदोष असलेल्यांसाठी क्युआर कोडसह स्पर्शकलेचे नमुने तसेच विकलांग मुलांनी तयार केलेली विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री मांडण्यात आली आहे.
पर्पल एक्झिबिशनमध्ये दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींसाठी अधिक परिणामकपणे शिक्षण घेता यावे, अभ्यास करता यावा यासाठी उपयुक्त अशी उपकरणे, उत्पादने मांडण्यात आली आहे. तसेच विकलांग व्यक्तींसाठी उपयुक्त कृत्रिम हात-पाय, व्हीलचेअर, तर उपकरणे आदी उपाययोजना प्रत्यक्ष अनुभवता येत आहेत.
पर्पल बायोस्कोप उपक्रमात ‘८६’ हा चित्रपट सादर करण्यात आला. चित्रपटात सांकेतिक भाषा दुभाषींच्या माध्यमातून चित्रपटाचा अर्थ सादर करण्यात आला आहे.


डिफ-ब्लाइंड अधिवेशन, असेस इंडिया अधिवेशन, फन एट बीच, क्रूझ राईड आदी उपक्रमांचीही रेलचेल पर्पल फेस्टच्या पहिल्या दिवशी अनुभवयाला मिळाली.
या तीन दिवसीय महोत्सवाची सांगता रविवारी, ८ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!