कला-साहित्य

७५ व्या गोवा क्रांतीदिनानिमित्त विशेष निबंध स्पर्धा

मडगाव :
कॉंग्रेस पक्षातर्फे गोवा मुक्तिदिनाच्या ७५व्या वर्षपुर्तीनिमीत्त गोव्यातील युवकांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा चार विभागात आयोजित करण्यात आली असुन, गोव्याचा इतिहास, वर्तमान व भविष्य यावर निबंध स्पर्धेचे विषय ठरविण्यात आले आहेत. स्पर्धकांकडुन आलेल्या निबंधांचा अभ्यास करुन गोव्याच्या उज्वल भवितव्याचा  कृती आराखडा तयार करताना त्यांत योग्य सुचनांचा समावेश करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेचे बक्षिस वितरण १८ जून २०२१ रोजी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

गोमंतकीय युवकांच्या राज्याच्या भवितव्याविषयी भावना समजुन घेण्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन, युवा वर्गाने या स्पर्धेत भाग घेवुन  आपल्या कल्पना मांडाव्यात असे आवाहन गिरीश चोडणकर यांनी केले आहे.

गोवा मुक्ती लढ्यात भाग घेवुन आपले सर्वस्व दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मनांतील गोवा साकारण्यासाठी व गोमंतकाची अस्मिता राखण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने आखलेला हा स्तुत्य उपक्रम आहे. युवकांनी त्यात मोठ्या संख्येने भाग घेवुन मजबुत व क्रियाशील गोव्यासाठी आपल्या मनातील विचार मांडावेत असे आवाहन विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केले आहे.

सदर निबंध स्पर्धा चार विभागात घेण्यात येणार असुन, अ गटात १४ ते १६ वयोगटातील युवकांना भाग घेता येईल. या गटासाठी ” १८ जून १९४६ व लोकांचा उठाव” हा विषय देण्यात आला असुन एक हजार शब्दात निबंध सादर करायचा आहे. ब गटात १६ ते १८ वयोगटातील युवकांना भाग घेता येईल. या गटासाठी ” गोवा मुक्तीच्या साठ वर्षात आम्ही काय मिळविले” हा विषय देण्यात आला असुन दिड हजार शब्दात निबंध सादर करायचा आहे.

goaया स्पर्धेतील तिसऱ्या क गटात १८ ते २१ वयोगटातील युवकांना भाग घेता येईल. या गटासाठी ” व्हिजन गोवा-२०३० ” हा विषय देण्यात आला असुन दोन हजार शब्दात निबंध सादर करायचा आहे तर चौथ्या क गटातील  २१ ते ३० वयोगटातील युवकांना समाज माध्यमांवरील बंधने योग्य आहेत का? या विषयावर अडिज हजार शब्दात निबंध सादर करायचा आहे अशी माहिती कॉंग्रेसचे समाजमाध्यम प्रमुख हिमांशू तिवरेकर यांनी दिली आहे.

या स्पर्धेसाठी अ व ब गटांसाठी प्रथम रोख ३ हजार, द्वितीय रोख २ हजार  व तृतिय रोख १ हजार  अशी बक्षिसे देण्यात येणार असुन, क व ड गटांसाठी प्रथम रोख ५ हजार , द्वितीय रोख ३ हजार व तृतिय रोख २ हजार  रुपये बक्षिसे देण्यात येतील. सर्व स्पर्धकांना प्रशस्तिपत्रे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत भाग घेवु इच्छिणाऱ्यांनी आपले निबंध १३ जून २०२१ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत goapcc@gmail.com ह्या ईमेलवर आपला जन्मदाखला किंवा आधार कार्डच्या प्रतिसोबत पाठवावेत. अधिक माहितीसाठी हिमांशू तिवरेकर यांच्याकडे भ्रमणध्वनी क्रमांक 8888338800 यावर संपर्क साधावा.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: