क्रीडा-अर्थमतगोवा 

गोव्याची शिखा पांडे पुन्हा भारतीय संघात

पणजी: 
गोव्याच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार शिखा पांडे  हिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दुसऱ्यांदा भारतीय संघात पुनरागमन केले आहे. पुढील महिन्यातील इंग्लंडच्या दौऱ्यासाठी तिला कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघात स्थान मिळाले आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यात एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळेल. एकमेव कसोटी सामन्यात 16 जूनपासून, तर दौऱ्यातील शेवटचा टी-20 सामना 15 जुलै रोजी खेळला जाईल. कसोटी आणि एकदिवसीय लढतीत मिताली राज, तर टी-20 मालिकेत हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे.

यावर्षी मार्च महिन्यात मायदेशी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी अनुभवी शिखाला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. यापूर्वी शिखाला 2018 साली विंडीजमध्ये झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते, त्यानंतर तिने जोरदार पुनरागमन केले होते. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शिखा उपविजेतेपद मिळविलेल्या भारतीय संघाची प्रमुख गोलंदाज होती. तिने स्पर्धेत 7 विकेट मिळविल्या होत्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: