गोवा 

‘गोव्यातही राजकीय क्रांती होणार’

पेडणे  (प्रतिनिधी) :
पोर्तुगीजांच्या जोखंडातून गोवा मुक्त व्हावा यासाठी असंख्य कार्यकर्ते भूमिगत पद्धतीने आपलं काम करत होते. पण गोवा मुक्ती संग्रामाची पहिली ठिणगी पडली ती डॉ. राम मनोहर लोहिया  व डाॕ. ज्युलिओ मिनेझिस  यानी  पुढाकार घेत पोर्तुगीज शासनाकडून गोव्यातील जनतेच्या मूलभूत अधिकारांची होत असलेली पायमल्ली लोहिया यांनी अनुभवली आणि त्याचमुळे ते पेटून उठले. यामुळे गोव्यात क्रांती करून पोर्तुगीजांना  गोव्यातील सेनेने त्यांना हकलून लावले आणि तीच क्रांती आता  गोव्यात राजकीय क्रांती शिवसेना करणार आहे. आज १८ जून पासून गोव्यात एक राजकीय क्रांती करण्याचा शिवसेनेचा निर्धार केला असून यासाठी गोव्यातील युवकाने मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश घ्यावा आणि गोव्यात राजकीय क्रांतीसाठी सज्ज व्हावे,असे आवाहन गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारकावर बोलताना केले.

गोवा राज्य शिवसेनेच्या वतीने १८ जुनचे औचित्य साधून ज्यांनी गोवा स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला या शूर वीरांच्या स्मृती स्थळ पत्रादेवी येथे भेट देऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत,गोवा राज्य शिवसेना उपप्रमुख सुभाष केरकर, उत्तर गोवा जिल्हा प्रमुख सुशांत पावस्कर, गोवा राज्य सरचिटणीस मिलिंद गावस, बार्देश तालुका प्रमुख व्हिन्सेन परेर, मंदार पार्सेकर, पेडणे तालुकाप्रमुख बाबली नाईक, विलास मळिक दिवाकर जाधव  , समीर पवार, कृष्णा आदी उपस्थित होते.

[] यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रादेवी येथील स्मारकावर पुष्प  अर्पण करून स्वतंत्र सेनानीना मानवंदना देण्यात आली. यावेळी पत्रकारांकडे बोलताना राज्यप्रमुख जितेश कामत म्हणाले की ,गोव्याच्या राजकारणात   जे प्रस्थापित राजकारणी आहेत आणि एका पक्षाचे नेते आहेत ते   आता सध्या  क्रांतीची भाषा करत असून ती भाषा त्यांच्या तोंडी सोबत नाही. ज्यावेळी सरकारात असताना सरकार विरोधात ब्र काढत नव्हते आणि आता मात्र त्यांना क्रांती सुचत असून त्यांना आता  त्यांची राजकीय जागा दाखवायला पाहिजे. मात्र गोव्यात आता राजकीय क्रांती घडवून आणण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली असून आजपासून गोव्यात राजकीय क्रांती घडवून आणण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असे आहे. या शिवसेनेच्या कार्याला गोव्यातील युवा पिढीने मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करून या राजकीय क्रांती घडवण्याच्या कार्याला सहकार्य करावे,असे आवाहन जितेश कामत यांनी केले.

यावेळी बोलताना गोवा राज्य शिवसेना उपप्रमुख सुभाष केरकर म्हणाले की, गोव्यात १९४६ मध्ये  क्रांती झाली म्हणून आज आम्हाला गोवा मुक्त झालेला दिसत आहे. या क्रांतीचे प्रणेते डॉक्टर राम मनोहर लोहिया असल्याने या आंदोलनात गोवा मुक्ती संग्रामाच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. क्रांती केल्यानेच चळवळ यशस्वी होते आणि तेच काम गोव्यात शिवसेना आता करणार असून आज पासून गोव्यात शिवसेनेने क्रांती करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी गोव्यातील जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी सुभाष केरकर यांनी केले.

यावेळी पेडणे तालुका शिवसेना प्रमुख बाबली नाईक म्हणाले की, गोव्याच्या भाजप सरकारने गोव्यातील जनतेची अवहेलना चालवली आहे. त्याबद्दल आता खऱ्या अर्थाने क्रांतीची गरज असून हे क्रांती आता भाजपच्या विरोधात गोव्यात शिवसेना करणार आहे. त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे व शिवसेनेला सहकार्य करावे,असे आवाहन  बाबली नाईक यांनी केले.

यावेळी गोवा राज्य शिवसेना सरचिटणीस मिलिंद गावस म्हणाले की, अनेक राज्यकर्ते आता क्रांतीची भाषा करत असून ही त्यांची वेगळी क्रांती गोव्यातील जनतेला माहित आहे. त्यासाठी खऱ्या क्रांतीची गरज असून सरकारात राहिल्यानंतर क्रांती सुचत नाही मात्र बाहेर पडल्यानंतर क्रांतीची भाषा येते आणि त्याबाबत आता शिवसेना त्याविरुद्ध आवाज उठवणार असून गोव्यातील शिवसेनेला क्रांती करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन गावस यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: