सिनेनामागोवा 

‘भाजपमुळेच राज्यात बेकायदा चित्रीकरण सुरु’

जोसेफ डायस यांची चित्रीकरण, इएसजी आणि इफ्फिवर थेट टीका

मडगाव :
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनी गोवा मनोरंजन संस्थेची स्थापना केली होती. परंतु, भ्रष्टाचाराने पोखरलेल्या इएसजी म्हणजे एक्स्ट्राव्हेगंट सोसायटी ऑफ गोवा तर्फे इफ्फिचे, इंटरनेशनल फ्रॉड फेस्टिव्हल ऑफ इंडियात परिवर्तन झाले. आज गोव्यात कोविड संकटकाळात चालू असलेली बेकायदा चित्रीकरणे म्हणजे स्व. मनोहर पर्रिकरांच्या भ्रष्ट वारशाचे प्रतिबिंब आहे असा आरोप दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष जोसेफ डायस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
गोव्यात चित्रपट संस्कृती अधिक प्रबळ व्हावी  तसेच चित्रीकरण, निर्मिती व संकलन यासाठी आवश्यक साधन सुविधा तयार करण्या ऐवजी स्व. मनोहर पर्रिकरांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना इफ्फिच्या नावे लुटमार करण्याची पूर्ण मोकळीक दिली. भाजप कार्यकर्त्यांनी अव्वाच्या सव्वा किमती लावुन कंत्राटे घेवुन सरकारी तिजोरी लुटली असा आरोप जोसेफ डायस यांनी केला. गोव्यात आज भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संगनमताने बेकायदा चित्रीकरण चालत असून, गोवा मनोरंजन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. सरकारी तिजोरीत पैसे जमा न करता हे सर्वजण परस्पर पैसे उकळुन आपली खिसे भरतात. यामुळेच गोवा सरकारला चित्रीकरणांपासून महसुल मिळत नाही असा दावा जोसेफ डायस यांनी या पत्रकात केला आहे.
सन २०१२ साली सत्तेत आल्यापासुन, भाजप सरकार सुमारे २५ ते ३० कोटी रुपये प्रत्येक वर्षी इफ्फि आयोजनावर खर्च करते. परंतु आज गोवा सरकारची भूमिका ही केवळ वाहतुक व निवास व्यवस्था एजंट एवढीच राहिली आहे. केंद्रिय माहिती व प्रसारण मंत्रालय व चित्रपट संचालनालयाने गोव्याचे इफ्फि आयोजनातील इतर सर्व अधिकार काढून घेतल्याचे जोसेफ डायस म्हणाले. सन २०१२ पासुन इफ्फिच्या प्रत्येक वर्षीच्या आयोजनात घोटाळे झाले आहेत. सांस्कृतीक कार्यक्रम, सजावट, रोषणाई अशा निविदांमध्ये घोळ झाल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विधानसभेत पुराव्यासकट दाखवुनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत चौकशी करीत नाहीत.

shooting‘गोमंतकीय सिनेमांना अद्याप आर्थिक सहाय्य नाही’
राज्यातील असंवेदनशील भाजप सरकारने सन २०१० ते २०१२ काळात तयार झालेले व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविलेल्या गोमंतकीय चित्रपटांच्या निर्मात्यांना अजुनही आर्थिक सहाय्य केलेले नाही. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांनी मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षपदी नेमणुक केलेले राजेंद्र तालक यांनी केवळ गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांना छळण्याचे काम केले. आपल्याच चित्रपटांना सर्व सरकारी सुविधा घेण्याचे एकमेव धोरण त्यांनी राबविले होते, अशी टीका डायस यांनी केली.
मडगावच्या रविंद्र भवनाचे काम हे सासष्टी तालुक्यातील कलाकार व संस्थाना सहाय्य, प्रोत्साहन देण्याचे असुन, गोव्याबाहेरील व्यावसायिकांना बेकायदा चित्रीकरणांसाठी सभागृह भाड्याने देणे ही रविंद्र भवनची जबाबदारी नाही. सध्या चालू असलेल्या चित्रीकरणाचा सेट उभारण्यासाठी जी सभागृहाची नासधूस झाली आहे त्याचा खर्च कोण देणार हे चेअरमन दामोदर नाईक यांनी स्पष्ट करावे, अशीही मागणी डायस यांनी केली. सदर मालिकेच्या एका भागाच्या प्रसारणावेळी आपली उपस्थिती असणार व स्वत:ला दोन शब्द बोलण्याची संधी मिळणार म्हणून रविंद्र भवनचे चेअरमन दामोदर नाईक यांनी आपले काही कर्मचारी कोविड बाधीत झालेले असतानाही सदर चित्रीकरण चालु ठेवण्यास भाग पाडले. महान गोमंतकीय कलाकार पाय तियात्रीस्त यांचे नाव दिलेल्या सभागृहात बेकायदा चित्रीकरण करू देणे हा महाभयंकर गुन्हा आहे, असे डायस यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नोंदवले आहे.
Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: