गोवा 

‘तृणमूल’ने केली फळ विक्रेत्यांची पाठराखण


पणजी:

गोवा तृणमूल काँग्रेसच्या नेत्या स्वाती केरकर आणि प्रिया राठोड यांनी आज गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या (गोमेकॉ ) बाहेर निदर्शने करणाऱ्या गाडे मालक आणि फळ विक्रेत्याना पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या.

भाजप सरकारने त्यांची दुकाने पाडली म्हणून त्यांनीं रोजीरोटी गमावली आहे. चांगल्या रस्ता आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीचा नावाखाली त्यांची दुकानें मोडण्यात आली आहेत . अहवालात असे सूचित केले आहे की 76 पेक्षा जास्त गाडे एका रात्रीत जमीनदोस्त केल्याने शेकडो गोमंतकीय विस्थापित केले गेले. ते आता पुनर्वसनाची मागणी करत आहेत.

दोन दिवसांच्या विशेष विधानसभा अधिवेशनाच्या, पहिल्या दिवशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या गाडे मालकांना त्यांचे 8 दिवसांच्या आत पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन दिले.तथापी , आंदोलनवर बसलेले आंदोलक अस्वस्थ व साशंक आहेत.दोन दिवसांच्या विशेष विधानसभा अधिवेशनाच्या, पहिल्या दिवशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या गाडे मालकांना त्यांचे 8 दिवसांच्या आत पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन दिले.तथापी , आंदोलनवर बसलेले आंदोलक अस्वस्थ व साशंक आहेत.


निषेध स्थळावर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना स्वाती केरकर यांनी,भाजपला दिलेले वचन पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल खिल्ली उडवली. त्या म्हणाल्या, ‘हे सरकार या विक्रेत्यांच्या दुर्दशेची जाणीव असूनही अत्यंत असंवेदनशील आहे.’ तिने पुढे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शब्दांना जागण्याचे आणि गाडेवाल्याना पुनर्वसन देण्याचा इशारा दिला.

गोव्यात नव्याने दाखल झालेल्या टीएमसी नेत्या प्रिया राठोड यांनीही गरिबांच्या भावनांशी खेळल्याबद्दल सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्या म्हणाल्या , ‘जर तुमच्याकडे निवडणुकांवर खर्च करण्यासाठी पैसे असतील, तर तुम्ही ते गरीब लोकांवर का खर्च करत नाही,जे आपल्या वास्तविक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहे. हे भाजप सरकारचे पूर्ण अपयश आहे. इतक्या जीवांशी खेळल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ’

दोन्ही नेत्यांनी फळ विक्रेत्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचे वचन दिले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: