गोवा 

गोवा विद्यापीठाचे वर्ग आजपासून बंद 

पणजीः
गोवा विद्यापीठाने 11 ते 24 मे दरम्यान सर्व ऑनलाइन वर्ग रद्द केले आहेत आणि हा कालावधी विद्यार्थी, शिक्षण आणि कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी म्हणून घोषित केला आहे. मात्र, सुट्टी नसलेले कर्मचारी घरून काम सुरू ठेवतील असं गोवा विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय.
कोव्हिड-19  महामारीच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी/कर्फ्यू लक्षात घेता, गोवा विद्यापीठाने विद्यापीठ कॅम्पसमध्ये आणि संलग्न महाविद्यालयांमधील 11 ते 24 मे 2021 पर्यंतचे ऑनलाइन वर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं गोवा विद्यापीठाने म्हटलंय. वैधानिक परिषदा/ संस्थांद्वारे नियंत्रित व्यावसायिक कार्यक्रम देणारी संलग्न महाविद्यालये या संदर्भात आपापल्या परिषदांच्या मार्गदर्शक तत्त्वांचं/सल्ल्याचं पालन करतील, असंही गोवा विद्यापीठाने नमूद केलंय.
दरम्यान, सर्व शाळांचे डीन, युनिव्हर्सिटी टीचिंग विभागांचे प्रमुख आणि संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य/ डीन यांनी विद्यापीठाच्या वरील निर्णयाची कृपया दखल घेऊन सर्व संबंधितांना माहिती द्यावी, असे आवाहन गोवा विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: