गोवा 

‘१८ ते ४४ वयोगटासाठीचा ‘टीका उत्सव ३’ रविवारपासून’

पणजी :
येत्या रविवारपासून राज्यातील 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी ‘टीका उत्सव – 3’ सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज संध्याकाळी आपल्या फेसबुक संवादामधून जाहीर केले.

आपल्या या संवादांमध्ये डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, 18 ते 44 वयोगटातील लोकसंख्येला लस देण्यासाठी सर्व पंचायती आणि नगरपालिकांमध्ये 87 कॅम्प्स सुरू केले जातील. राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्वांचे लसीकरण 30 जुलै 2021 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट्य राज्य सरकारने समोर ठेवले आहे.

दरम्यान, प्रत्येक पंचायत तसेच नगरपालिकांचे वेळापत्रक राज्य सरकार लवकरच जाहीर करणार आहे. त्यामुळे लोकांनी लसीकरण केंद्रात जाण्याची घाई करण्याची गरज नाही. लसीकरणासाठी लाभार्थी ‘वॉक-इन’ करू शकतात. तसंच प्रत्येक लसीकरण केंद्रात दररोज 250 लसी दिल्या जातील, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: