गोवा 

वास्कोतील दुहेरी खून प्रकरणातील आरोपी प्रतिमा नाईकची मुक्तता

पणजी :
मांगोरहिल – वास्को येथे २०१५ साली सासू उषा नाईक आणि जाऊ डाॅ. नेहा नाईक यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी प्रतिमा नाईक हिला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली होती. हा आदेश खंडपीठाने गुरुवारी रद्द करून तिला मुक्त केले आहे. याबाबतचा निवाडा न्यायमूर्ती डी. एस. नायडू आणि एम. एस. जवळकर या द्विसदस्यीय खंडपीठाने दिला आहे.
या प्रकरणी वास्को पोलिसांनी २१ मे २०१५ रोजी आरोपी प्रतिमा नाईक हिच्यासह अन्य संशयित अभिजीत कोरगावकर विरोधात मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. त्यात म्हटले होते की, आरोपी प्रतिमा नाईक हिने ३० जानेवारी २०१५ रोजी मध्यरात्री तिची सासू उषा नाईक व जाऊ डॉ. नेहा यांना रात्री दुधातून झोपेच्या गोळ्यांची पूड मिसळून दिली होती. त्यानंतर दोघीही रात्री बेशुद्ध झाल्यानंतर त्यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपी प्रतिमा हिने त्यांचे सर्व सुवर्ण दागिने चोरले. या प्रकरणी वास्को पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३८० आणि ३२८ नुसार गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, इस्पितळातून डिस्चार्ज दिल्यानंतर पोलिसांनी २ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रतिमा नाईक हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रितसर अटक केली. प्रतिमा हिला मदत केल्याप्रकरणी अन्य संशयित अभिजीत कोरगावकर यालाही अटक करण्यात आली होती.
goaत्यानंतर न्यायालयाने संशयित अभिजितला माफीचा साक्षीदार होण्यास परवानगी दिली. तदनंतर सुनावणी पूर्ण होऊन जिल्हा व सत्र न्यायालायने २९ मार्च २०१७ रोजी आरोपी प्रतिमा नाईक हिने सासू आणि जाऊचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. या प्रकरणी प्रतिमा नाईक यांच्यातर्फे खंडपीठात वरिष्ठ वकील कार्लुस फेरेरा यांनी सहकार्य केले; तर गोवा विधी सेवा मार्फत वकील पृथ्वी बांदेकर यांनी प्रतिमा नाईक हिची बाजू मांडली.

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: