गोवा 

अधिवेशन घ्या ऑनलाईन : विजय सरदेसाई

पणजी:
विविध मुद्यांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले असतानाच विधिमंडळातील परीक्षेस सरकारला सामोरे जावे लागत आहे. शून्य तासाचे सात विषय, चार लक्षवेधी सूचना, तिसेक सरकारी विधेयके, अर्थसंकल्पावरील सारी चर्चा, सहाशे प्रश्न या साऱ्याचा सामना सरकारला आज करावा लागणार आहे.

दरम्यान, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ऑनलाईन अधिवेशन घ्या अशी मागणी केली आहे. राज्यातील सरकारी कार्यक्रम तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात आले तेव्हा कोविड – 19 चे नियम लागू होत नाही का? राज्यातील गावे पुरामुळे पाण्याखाली गेली असताना तसेच अनेकांचे संसार उद्‍ध्वस्त झाले असताना त्यांच्या आगमनासाठी ढोल बडवण्यात आले अशी सडकून टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली होती. कोविडच्या नावाखाली अधिवेशनचे कामकाज कमी दिवसांचे का? अशी विचारणा त्यांनी केली.

विधिमंडळ कामकाज नियमानुसार सायंकाळी सहा वाजेपर्यंत विधानसभा कामकाज संपवायचे असते. मात्र तीन दिवसांचे अधिवेशन बोलावले म्हणून विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतच विरोधी आमदारांनी नाराजीचा सूर लेखी स्वरूपात व्यक्त केला होता. त्यामुळे सरकारी कामकाज आटोपण्यासाठी रात्री उशिरापर्यंत विधानसभा कामकाज चालवणे भाग पडू शकते, अर्थात विरोधक कामकाजात सहभागी झाले तर, त्यांनी बहिष्कार टाकला तर सरकारला आपला मार्ग मोकळा झाल्यासारखे होईल.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: