google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

गोडसे विरोधात सातारा पोलिसात गुन्हा नोंद

सातारा (महेश पवार) :

सातारा महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या पगारातून जवळपास सोळाशे कामगारांच्या पगारातून कपात करुन कामगारांच्या कष्टाच्या पैशावर डल्ला मारणार्या ठेकेदारांच्या विरोधात सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर संबंधित तक्रारीवर तात्काळ कारवाई चे आदेश देण्यात आला होता.

या प्रकरणी सातारा Lcb च्या तपासात मोठे धागेदोरे सापडल्याने संबंधित ठेकेदार सोमनाथ गोडसे व राना ॲग्रो कंपनी विरोधात सातारा शहर पोलीसात फसवणूक व खोटी कागदपत्रे करण्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून .FIR No. 0466/2022 has been registered Under Section IPC 1860 – 467, 468, 471, 420, 406, 34 या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण कंपनीच्या कंत्राटी कामगारांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारुन टक्केवारी घेणार्या गोडसे वर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात सहभागी असणाऱ्या मातब्बर नेते मंडळी व अधिकार्याना कर्मचारी वर्गाने दिलेल्या तक्रारीने ४४०चा झटका बसल्याने अनेक अधिकारी आणि नेतेमंडळींनी आपली अटक टाळण्यासाठी धावाधाव सुरू केली असून या प्रकरणात महावितरण चे बडे अधिकारी सुध्दा पोलिसांच्या हिट लिस्टवर असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!