गोवा 

​’गोमंतकीय राजीव गांधींचे नेहमीच ऋणी’

​मडगाव :
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थाना मजबुत करण्याचे काम राजीव गांधीनी केले. परंतु, भाजप सरकारने आज राज्याची स्थिती संघप्रदेशासारखी करुन टाकली आहे असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.

माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात आयोजित आदरांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस, प्रदेश कॉंग्रेसचे सुभाष फळदेसाई, दामोदर शिरोडकर तसेच जिल्हा कॉंग्रेसचे पिटर गोम्स, ॲड. येमन डिसोजा, आर्क. रॉयला फर्नांडिस व इतर हजर होते.

केंद्रातील कॉंग्रेस सरकारांचे गोव्यासाठी खास योदगान होते. स्व. राजीव गांधी यांनी गोव्याला घटकराज्याचा दर्जा दिला. कोंकणीला राजभाषेचा दर्जा व घटनेच्या आठव्या परिशिष्टात स्थान राजीव गांधीमुळेच मिळाले हे सत्य आहे. गोव्यावर केलेल्या उपकारांसाठी ​​गोमंतकीय नेहमीच त्यांचे ऋणी राहतील असे दिगंबर कामत म्हणाले.

कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यावेळी बोलताना स्व. राजीव गांधी यांनी संघीय प्रणालीचा वापर करुन स्थानिक स्वराज्य संस्थानी अधिकार दिल्याचे सांगीतले. नगरपालीका व पंचायतीना मजबुत बनविण्याचे काम स्व. राजीव गांधीनी केले. आजचा दिवस कॉंग्रेस पक्ष माणुसकीला सेवा देवुन पाळणार  असल्याचे त्यांनी सांगीतले . आज भाजप सरकार देशात कोविड लसीकरण करण्यासाठी चाचपडत असताना, देशवासीयांना कर्तबगार असलेल्या माजी पंतप्रधान राजीव गांधीची उणीव भासते असे ते म्हणाले. राजीव गांधीनी जी स्वप्ने पाहिली ती प्रत्यक्षात उतरवुन दाखविली असे गिरीश चोडणकर म्हणाले.

महिला कॉंग्रेस अध्यक्ष बिना नाईक यांनी महिला कॉंग्रेसने हाती घेतलेल्या विवीध उपक्रमांची माहिती दिली. दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष ज्यो डायस यांनी संपुर्ण दक्षिण गोव्यात विवीध गट कॉंग्रेसतर्फे सेवा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. कोविड व चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना मदत करण्यासाठी कॉंग्रेस सदस्य आज कार्यरत असल्याचे ते म्हणाले.

सुरूवातीला उपस्थित सर्व कॉंग्रेस नेते, पदाधिकारी व सदस्य तसेच कार्यकर्त्यांनी स्व. राजीव गांधींच्या तसबिरीला पुष्पांजली अर्पण करुन आदरांजली वाहिली.​

Share

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Kindly Dont Copy !!
%d bloggers like this: